1. याच महिन्यात राज्य मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाची शक्यता, रिक्त मंत्रिपदं, खातेबदलांबाबत याच आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक
2. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीकडे लक्ष, महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देण्याची चिन्हं, पुन्हा भाजपला साथ देणार का याची उत्सुकता
3. महाराष्ट्रातील काँग्रेस आमदार अजूनही सोनिया गांधींच्या भेटीच्या प्रतीक्षेत, महाविकास आघाडीत होणाऱ्या कोंडीबद्दल दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार
4. महाराष्ट्र उन्हात होरपळून निघत असताना काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, सोलापुरात गहू, कांदा आणि द्राक्षाच्या पिकाला फटका
5. उन्हाचा कडाका वाढल्यामुळं लिंबाचे दर गगनाला, एक झडन लिंबासाठी 100 रुपयांची नोट मोडण्याची वेळ
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 04 एप्रिल 2022 : सोमवार : एबीपी माझा
6. दोन वर्षानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा रंगणार, आजपासून साताऱ्यात स्पर्धेला सुरुवात, गदा पटकवण्यासाठी पैलवानांची जोरदार तयारी
Maharashtra Kesari Kusti Competition : कोरोनामुळे गेले दोन वर्ष जणू काही सारं विश्वच थांबलं होतं. मात्र आता निर्बंधमुक्तीनंतर गाडा रुळावर यायला लागलाय. अशातच आजपासून साताऱ्यामध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दोन वर्षांनंतर ही स्पर्धा होत असल्यानं यावर्षी सर्व पैलवान मोठ्या तयारीनिशी फडात उतरणार आहेत.
7. गोंदियाच्या बिर्शीतील 106 कुटुंबियांना हक्काच्या घरासाठी जागा मिळणार, माझाच्या बातमीनंतर गावकऱ्यांना स्वतंत्र भूखंड देण्याचा निर्णय
8. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचं मुंबईतील मशिदींकडून पालन, मुंबई अमन समितीच्या अध्यक्षांची माहिती, तर राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेचे मुस्लिम पदाधिकारी नाराज
9. सोन्याच्या लंकेवर आर्थिक संकट, श्रीलंकेत सरकारविरोधी निदर्शनं सुरूच, आंदोलकांचा राष्ट्रपती भवनावर मोर्चा
Sri Lanka Crisis : भारताचा शेजारी देश श्रीलंका आज गरिबीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. येथे महागाई गगनाला भिडली आहे. देशभरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. विजेअभावी रुग्णांच्या आवश्यक शस्त्रक्रियाही रुग्णालयात होत नाहीत, कारखाने बंद, पेपर कमी असल्याने परीक्षा रद्द, रेल्वे-बसची वाहतूक ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तेलाचा अभाव.. पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडली आहे, घरातील चुल बंद झाल्या आहेत आणि खाण्यापिण्याच्या तुटवड्यामुळे दुकानांमध्ये लूट सुरू झाली आहे.
10. उत्तर कोरियाकडून दक्षिण कोरियाला धमकी, किम जोंग उनच्या बहिणीकडून अणुबॉम्ब हल्ल्याचा इशारा, जगाचं टेन्शन वाढलं