Maharashtra: दोन दिवसापूर्वी झालेल्या मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिद, मदरशावर धाडी टाका आणि मशिदीवरील भोंगे काढा, असे वक्तव्य केले होते .राज ठाकरे यांच्या विधानानंतर मनसेच्या मुस्लिम नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी नाराजी व्यक्त करत राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर मुस्लिम पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यानंतर निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं आहे.


 इरफान शेख हे पक्षाच्या स्थापनेपासून सदस्य आहेत. शेख यांनी मनसे प्रमुख ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या आज समाजाला सामोरे जाताना जाणीव झाली. 16 वर्षाचा प्लॅशबॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आलं. या भावनिक पोस्ट विषयी शेख यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर पक्षातील कार्यकर्ते आणि समाज प्रश्न विचारु लागलाय, पक्षाचे नेमकी भूमिका काय आहे?पक्षात नेमके चालंलय काय?


2009 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत कल्याण पश्चिमेतून मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांना मुस्लिम मतदारांनी मतदान केलं होतं. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी  पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मेहनत घेतली होती. त्यानंतर 2019 साली कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांना देखील कचोरे, नेतिवली, डायघर विभागातून मुस्लिम मतदान झाले आहे. आत्ता मनसेतील मुस्लिम कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची येत्या दोन दिवसात बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे असे शेख यांनी सांगितले. मशीदीवरील भोंगे आणि त्यावरुन दिली जाणारी बांग यासंदर्भात विशिष्ट डेसीबल, वेळ आणि अंतराची मर्यादा न्यायालयाने ठरवून दिली आहे. ही समुपदेशन करुन करण्यात आली असती. औरंगाबाद येथे हा प्रयोग करण्यात आला आहे. सौदी येथील राजवटीनेही भोंग्यांची तीव्रता कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लीस  न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे वागण्यास तयार होतील. त्यामुळे पक्ष प्रमुख ठाकरे यांनी अशा प्रकारची भूमिका घेताना समाजाला विश्वात घेऊन या गोष्टी करता आल्या असत्या. समाजाला अंगावर घेण्याची गरज नव्हती असे शेख यांनी सांगितले. 


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha