दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


1. कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा, औरंगाबादचे साळुंखे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी, राज्यावरील संकट दूर करण्याचं फडणवीसांचं साकडं


आज कार्तिकी एकादशी... कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापुजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली.  यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. शासकीय महापुजा संपन्न झाल्यानंतर 'मंदिर 2023' डायरीचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालं. तसेच विठ्ठल रुक्मिणी दागिन्यांच्या अल्बमचंही प्रकाशन झालं. त्यानंतर फडणवीसांनी सपत्निक नामदेव वाड्याला भेट दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना नामदेव पगडी घालून त्यांचा सत्कार केला. यावेळी अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यासोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.. त्यानंतर पंढरपूर ते घुमान सायकल वारीला उपमुख्यमंत्र्यांनी झेंडा दाखवला.


2. तीन महिन्यांत धान्य, भाज्या, दूध, तेल महागण्याची शक्यता, एसबीआयच्या अहवालात महागाईचं भाकित, परतीच्या पावसाने पिकांचं नुकसान झाल्यानं धान्य तुटवडा जाणवणार


आधीच महागाईच्या झळा सोसाव्या लागत असताना आता पुढच्या तीन महिन्यांत महागाई आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. एसबीआयनं दिलेल्या अहवालात हे भाकित करण्यात आलंय. यावेळच्या महागाईला परतीचा पाऊस कारणीभूत ठरणार आहे. परतीच्या पावसानं खरीप पिकाचं नुकसान झालं. त्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा जाणवणार आहे. त्यामुळे महागाई वाढून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.


3. शिर्डीत आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय अधिवेशन, रुग्णालयात असल्याने शरद पवार उपस्थित राहणार नाहीत, प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार


महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर आता सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलीय. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिर्डीत आजपासून राष्ट्रवादीचं २ दिवसीय शिबीर होतंय.
रुग्णालयात उपचार घेत असल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार आज या शिबिराला उपस्थित राहणार नाहीत. या शिबीरात जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.


4. संजय शिरसाट ठाकरे गटाच्या संपर्कात, सुषमा अंधारेंचा दावा, तर सुषमा अंधारेंचा गैरसमज झालाय, शिरसाट यांचं स्पष्टीकरण


5. कोल्हापुरात आज राज्यपाल कोश्यारी आणि कर्नाटकच्या राज्यपालांची महत्त्वाची बैठक, अलमट्टीची उंची वाढवण्याच्या प्रश्नासह सीमा भागातील मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता


6. गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक, अरविंद केजरीवालही आपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणार तर राहुल गांधींच्या गुजरात दौऱ्याचीही चर्चा


7. महाराष्ट्रासाठी सव्वा दोन लाख कोटींचे प्रकल्प, मुंबईतील रोजगार मेळाव्यात मोदींची माहिती, तर पारदर्शी नोकरभरतीचं शिंदे-फडणवीसांचं आश्वासन


8. आजपासून ट्विटरमध्ये कर्मचाऱ्यांची कपात, मेसेजिंग प्लॅटफॉर्म फायदेशीर करण्यासाठी एलन मस्क यांचा निर्णय, कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे माहिती


9. Twitter कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, आजपासून मस्क यांच्याकडून कर्मचारी कपात करण्यास सुरुवात


10. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची प्रकृती स्थिर, पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने हल्ल्याचा कट रचल्याचा संशय, इस्लामाबादसह अनेक शहरात तोडफोड