Agriculture News in Nandurbar : नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाताची लागवड (Cultivation of rice) केली जात असते. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात भाताची लागवड केली आहे. सध्या या भात कापणीला सुरुवात झाली आहे. आदिवासी भागातील वाड्या पाड्यांवर भात कापण्यासाठी धावपळ दिसून येत आहे. तर काही ठिकाणी भात कापून गंजी लावल्या जात आहे. तसेच कोकणातही भात काढणीला सुरुवात झाली आहे. यावर्षी परतीचा पाऊस (Rain) आणि अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून उत्पादनात घट येणार आहे.
परतीच्या पावसाचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं या पावसामुळं वाया गेली आहे. तर काही ठिकाणी अशा स्थितीतून देखील शेतकऱ्यांची पिकं वाचली आहेत. अशा वाचलेल्या पिकांची सध्या काढणी सुरु आहे. नंदूबार जिल्ह्याला देखील परतीच्या पावासाचा मोठा फटका बसला आहे. सोयाबीनसह, कापूस, भात पिकांचं मोठं नुकसान या पावसामुळं झालं आहे. यावर्षी भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यामुळं भाताचे एकरी उत्पादन घटले असून, उत्पादन खर्चही निघणार नसल्याने भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
पारंपारिक पद्धतीनं भाताची मळणी सुरु
दरम्यान, भात उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. काही ठिकाणी पारंपारिक पद्धतीनं भाताची मळणी सुरू झाली आहे. तर काही ठिकाणी मळणीसाठी बैलाऐवजी ट्रॅक्टरचाही उपयोग केला जात आहे. नवापूर तालुक्यात सेंद्रिय पद्धतीनं लागवड केलेला सुगंधी तांदुळाला देशभरात मोठी मागणी असल्याने यावर्षी तांदुळाला दर काय मिळतात? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोकणातही भात कापणीला सुरुवात
कोकणात मोठ्या प्रमाणावर भाताची लागवड केली जाते. त्या ठिकाणी भात लागवडीसाठी पोषक वातावर आहे. तिथे देखील यावर्षी परतीच्या पावसाचा मोठा फटका भाताच्या पिकाला बसला आहे. त्यामुळं तिथेही उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या कोकणात सर्वत्रच भात कापणी सुरु आहे. चिपळूणमध्यला खेंड जाखमाता परिसरातील शेतातील भात कापणी करत असताना शेतातील चिखलात मगर आढलून आली. ही मगर पाहिल्यावर शेतकरी घाबरला होता. सर्व काम सोडून शेताबाहेर आला. लगेच सहकाऱ्यांच्या वतीनं वनविभागाला कळवण्यात आलं. वनविभागाचे अधिकारी तिथे पोहोचल्यावर मगरीला जवळपास दोन तास रेस्कू करुन पिंजऱ्यात पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या: