एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2021 | गुरुवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2021 | गुरुवार
- बेळगावसह वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेला कर्नाटकचं प्रत्युत्तर, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांच्याकडून मुंबईवर कर्नाटकचा हक्क असल्याचा उरफाटा दावा https://bit.ly/36kdz6s
- 'कर्नाटकचा मुंबईशी संबंधच नाही'; अजित पवारांचं कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर https://bit.ly/3j1sRSH महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे कर्नाटक सरकारने विसरु नये, खासदार संजय राऊत यांचा इशारा https://bit.ly/2YmfMdd
- दुसऱ्यांचे हिरावून नको तर आमच्या हक्काचं आरक्षण द्या, मराठा आरक्षणावर छत्रपती उदयनराजे भोसले यांची साताऱ्यात मागणी https://bit.ly/3osGxqO नरेंद्र पाटील यांनी स्थापन केलेल्या अण्णासाहेब पाटील फाऊंडेशनच्या कार्यक्रमात शिवेंद्रराजेंकडून संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजेंकडे मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व देण्याचं आवाहन https://bit.ly/3ahFR2O
- भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंच्या नावाखाली आक्षेपार्ह शब्द, गृहमंत्र्यांकडून दखल https://bit.ly/36kDta4 चंद्रकांत पाटील म्हणाले, संबंधितावर कारवाई करणार https://bit.ly/2YoXJ60
- महाराष्ट्रातलं पॉलिटिकल फिक्सिंग! लातूर ग्रामीणच्या आमदारकीवरुन संभाजी पाटील निलंगेकर यांचा गौप्यस्फोट https://bit.ly/3pqJsBH लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून फिक्सिंगचा इन्कार, निलंगेकरांच्या आरोपांचा रोख भाजप नेत्यांवर असल्याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3oojCgp
- ईडीच्या चौकशीच्या रडारवर आता मुंबईतील बिल्डर, ओमकार ग्रुपचे बाबुलाल वर्मा आणि कमल गुप्ता यांना अटक https://bit.ly/2Muslk6
- सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतरही पोक्सो कायद्यातून प्रौढ आरोपीला दोषमुक्त करणारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आणखी एक निर्णय, गडचिरोलीतील 50 वर्षीय प्रौढ दोषमुक्त https://bit.ly/3or9ALt
- IMF च्या मुख्य अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांच्याकडून मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचं समर्थन, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्याचाही विश्वास https://bit.ly/3qWtFek
- भाविकांकडून शिर्डीच्या साई संस्थानला भरभरुन दान, 71 दिवसांत सोन्या-चांदीसह 32 कोटी जमा https://bit.ly/2YmglUn
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement