मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
आज आषाढी एकादशीआज आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्ताने नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक पूजा करण्यात येणार आहे.मुख्यमंत्र्यांचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे –मध्यरात्री 2 वाजता- मुख्यमंत्री शासकीय विश्रामगृहाहून विठ्ठल मंदिराकडे निघणार.मध्यरात्री 2.30 वाजता- शासकीय महापूजापहाटे5.30 वाजता- पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमीपूजनपहाटे ५5.45 वाजता- पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे नदीघाटाचे लोकार्पणसकाळी 11.15 वाजता- शासकीय विश्रामगृह , पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभसकाळी 11.45 वाजता- पंचायत समिती, पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी समारोप कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पंढरपूरमध्ये शिवसेना मेळावाआज पंढरपूर येथे शिवसेना पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. आषाढी एकदशीचे राज्यभरातील कार्यक्रममुंबई- प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वडाळा विठ्ठल मंदीरात भाविकांची गर्दी होणार आहे. कोरोनाच्या संकंटानंतर मोठ्या जल्लोषात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.अहमदनगर- जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पारनेर तालुक्यातील पळशी येथील विठ्ठल मंदीरात आषाढी एकादशीनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धुळे - शहरातील स्वातंत्र्यपूर्व कालखंडात बांधण्यात आलेल्या मालेगाव रोडवर असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होणार आहे. कोरोनाच्या तब्बल 2 वर्षांच्या कालखंडानंतर गर्दी होणार असून या ठिकाणी यात्रा भरते. शिर्डी- आषाढी एकादशी व रविवार असल्यानं पंढरपूरप्रमाणे शिर्डीत सुद्धा भक्तांची गर्दी होईल.अमरावती- विदर्भातील हजारो भाविक आषाढी एकादशीला विदर्भाची पंढरी कौडण्यपूरमध्ये येणार. ज्यांना पंढपुरला जाणं शक्य होत नाही असे विदर्भातील हजारो वारकरी विठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी विदर्भाची पंढरी असलेल्या कौडण्यपूर येथे दर्शनाला येतात. आज देशभर बकरी ईदचा उत्साह आज देशभर बकरी ईद साजरी केली जाणार आहे. रमजानच्या पवित्र महिन्यानंतर 70 व्या दिवशी ही ईद साजरी केली जाते. आजच्या दिवशी नमाजचे पठण केल्यानंतर कुर्बानी देण्यात येते. अमरनाथमधील रेस्क्यू सुरुचअमरनाथमधील ढगफुटीनंतर मृतांची संख्या 16 झाली आहे. बेपत्ता नागरिकांचा शोध आणि रेस्क्यू अजूनही सुरु आहे. आज किंवा उद्यापासून पुन्हा अमरनाथ यात्रेला सुरुवात होईल. श्रीलंकेतील आंदोलन तीव्र, पंतप्रधानांचं खाजगी निवासस्थान आगीच्या भक्ष्यस्थानीपंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा दिला आहे. आंदोलकांनी रात्री त्यांचं खासगी निवासस्थान पेटवून दिलं. राष्ट्रपती गोटाबाया राष्ट्रपती भवन सोडून पळून गेल्यानंतर अजूनही त्यांच्या घरावर आंदोलकांचा ताबा आहे. गोटाबाया 13 जुलैला राजीनामा देणार आहेत. शिंजो आबे यांच्या हत्येनंतर आज जपानमध्ये मतदानजपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं शव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं आहे. आज जपानमध्ये संसदेच्या वरिष्ठ सदनाचं मतदान पार पडणार आहे. आजही महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारामुंबई आणि कोकण किनारपट्टीला आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
छगन भुजबळ यांचा दिल्ली दौरा, ओबीसीच्या मुद्द्यावर वकिलांची भेट माजी मंत्री छगन भुजबळ आजपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. भुजबळ ओबीसी आरक्षण सुनावणीच्या पार्श्वभूमीवर वकिलांच्या भेटी घेणार आहेत. तसेच, सैनी समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला देखील उपस्थिती लावणार आहेत. भुजबळ देशातील काही महत्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता आहे.
