Todays Headline 7th August : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत
मुंबई :ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..
अकासा एअरचं पहिलं विमान उडणार
राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीचे अकासा एअर कंपनीचे (Akasa Air) पहिलं विमान उडणार आहे. पहिले विमान हे 7 ऑगस्ट 2022 पासून मुंबई ते अहमदाबादला (Mumbai To Ahmedabad) उड्डाण करणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, कोची या चार शहरांना जोडले जाणार आहे.
इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक, आज होणार उड्डाण
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Launch Vehicle (SSLV) असं या नव्या प्रक्षेपकाचे नाव असून कमी वजनाचे उपग्रह, 500 किलोग्रॅमपेक्षा कमी वजनाचे उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी या प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. या रॉकेट प्रक्षेपकाची निर्मिती इस्रोने केली असून याचे पहिले उड्डाण हे आज होणार आहे.
जयदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनखड यांनी बाजी मारली आहे. त्यांनी विरोधकांचे उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला आहे. धनकड यांना 528 टक्के मतं तर मार्गारेट अल्वा यांना 182 मतं मिळाली आहेत. जगदीप धनखड 11 ऑगस्टला नवे उपराष्ट्रपती ची शपथ घेतील. देशाचे सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपतोय. समाप्त होणार आहे.
आज इतिहासात
1941 साली नोबल पारितोषिक विजेता भारतीय राष्ट्रगीताचे जनक कवी, संगीतकार, कलाकार आणि भारतीय उपखंडातील आयुर्वेद-संशोधक रवींद्रनाथ टागोर यांचे निधन.
1947 साली मुंबईच्या महानगर पालिकेने बेस्ट कंपनी आपल्या ताब्यात घेतली.