Todays Headline : आज अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल असणार आहे. ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष अशा झालेल्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान 3 नोव्हेंबरला पार पडलं.  भाजपकडून महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी जागर मुंबईचा अंतर्गत पहिली जाहीर सभा वांद्र्यात होणार आहे. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत. 


आज अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल
ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष अशा झालेल्या लढतीचा निकाल आज लागणार आहे. रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान 3 नोव्हेंबरला पार पडलं. आज या निवडणुकीचा निकाल आहे.  सकाळी 8 वाजता टपाल मतमोजणीला सुरुवात होईल. 


सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांची पत्रकार परिषद
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.  
 
मातोश्रीच्या अंगणापासून भाजपचं मिशन मुंबई, आजपासून जागर मुंबईचा
भाजपकडून महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी जागर मुंबईचा अंतर्गत पहिली जाहीर सभा वांद्र्यात होणार आहे. आशिष शेलार, पूनम महाजन सभेला संबोधित करतील. वांद्रे पूर्व येथे संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहे. 
 
बुलढाण्यात रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत, सोयाबीन, कापूस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या मोर्चात जवळपास 30 हजार शेतकरी राज्यभरातून सामील होणार आहेत.  
 
मुख्यमंत्री ठाण्यातील काही सामाजिक कार्यक्रमांना उपस्थिती लावणार 
मुख्यमंत्री ठाण्यातील काही सामाजिक कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. ठाण्यातील पहिल्या 5 स्टार हॉटेलचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते केले जाणार. तर मुख्यमंत्री यांच्या मतदार संघातील वागळे इस्टेट, टोल नाका परिसरात देखील कोकण महोत्सव आणि मेळाव्यांना मुख्यमंत्री उपस्थित राहणार.  
 
चंद्रकांत पाटील विधान भवनमधे पुण्यातील विविध विषयांवर अधिकाऱ्यांसोबत बैठक 
 पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील विधान भवनमधे पुण्यातील विविध विषयांवर अधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार 
 
अहमदनगरमध्ये  महाराष्ट्र राज्य आणि माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन


महाराष्ट्र राज्य आणि माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे दोन दिवसीय अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. यावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे उपस्थित राहणार आहेत. 
 
आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित जिल्ह्याच्या नंदूरबार दौऱ्यावर 
राज्याचे आदिवासी विकास मंत्री  विजयकुमार गावित जिल्ह्याच्या नंदूरबार दौऱ्यावर आहेत. ते सातपुड्याच्या दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. 


भारत वि. झिम्बाब्वे संघात लढत
 
 आज टी-20 वर्ल्डकपमध्ये मेलबर्नमध्ये भारत विरूध्द झिम्बाब्वे सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामना सुरु होईल.