मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


आजपासून 'हर घर तिरंगा' उपक्रम
भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याची सुरुवात आजपासून होत आहे. यावर्षी आपण सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहिमेला पाठबळ देऊया असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यासाठी 13  ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा फडकवा किंवा तुमच्या घरांमध्ये तिरंगा लावा, या मोहिमेमुळे आपले राष्ट्रीय ध्वजाशी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ होतील असेही मोदी म्हणाले. 


पंतप्रधानांच्या हस्ते पदक विजेत्यांचा सन्मान
कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकांनी पदक जिंकलं आहे त्यांचा आज पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज कोल्हापूर आणि सांगली दौरा
मुख्यंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली दौऱ्यावर जाणार आहेत. 


माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासंदर्भात आज आपची पत्रकार परिषद
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासंबंधित मुंबईत आज आप पक्षाची पत्रकार परिषद होणार आहे. संजय पांडे यांना फसवण्यात येत आहे, त्यांच्या विरोधात खोटी कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप आपने या आधी केला आहे. त्याच संदर्भात आज दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.