LIVE UPDATES | 1 मार्च रोजी पहाटे असलेल्या मेगा ब्लॉक मुळे खालील गाड्या रद्द राहतील किंवा लेट धावतील
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
04 Mar 2020 07:09 PM
बीड : माजलगावच्या नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी, भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये नगराध्यक्षांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी घेतले होते ताब्यात, माजलगाव नगर पालिकेचं पाच कोटी रुपयांच्या अपहाराचं प्रकरण, माजलगाव मुख्याधिकारी व लेखापाल यांना 6 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
सारथी संस्थेच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या समितीच्या अहवालात ताशेरे. किशोर राजे निंबाळकर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवांच्या चौकशी समितीमध्ये सारथी समितीच्या कामकाजामध्ये अनियमितता आढळून आल्या.
डहाणू कडे जाणाऱ्या -
1. विरारहून पहाटे 4.40 मिनिटांनी सुटणारी विरार - संजान मेमु रद्द राहील
2. विरारहून पहाटे 5 वाजता सुटणारी डहाणू लोकल रद्द राहील
3. विरारहून पहाटे 5.35 मिनिटांनी सुटणारी डहाणू लोकल रद्द राहील
4. चर्चगेट वरून पहाटे 4.58 मिनिटांनी सुटणारी डहाणू लोकल रद्द राहील
5. चर्चगेट वरून 5.24 मिनिटांनी चर्चगेट डहाणू लोकल आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटे उशिराने डहाणू येथे पोहचेल
मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या -
1. डहाणू येथून 7.05 मिनिटांनी सुटणारी विरार लोकल रद्द राहील
2. डहाणू येथून 7.15 मिनिटांनी सुटणारी चर्चगेट लोकल रद्द राहील
3. डहाणू येथून 8.30 मिनिटांनी सुटणारी बोरिवली लोकल रद्द राहील
4. भरुच येथून दुपारी 2.05 मिनिटांनी सुटणारी भरूच विरार मेमु सुरत येथून 4.25 मिनिटांनी सुटेल
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघ वरळीतच झाडांची कत्तल? , *जाहिरातीच्या होर्डींगला अडथळा निर्माण होतो,म्हणून होर्डींगच्या अर्थकारणासाठी अवैधरित्या झाडे कापली असल्याचा मनसेचा आरोप , सी फेस जवळील मुंबई महापालिकेच्या शाळेजवळील तसंच कावेरी सहकारी सोसायटीच्या आवारातील झाडे कापली असल्याचा आरोप मनसेनं केला आहे, तसेच या परिसरातील इतर झाडांना इंजेक्शन देऊन मारले जात असल्याचेही मनसेकडून सांगण्यात येत आहे. याबाबत मनसेनं मुंबई महापालिका आयुक्त आणि उद्यान अधिक्षकांना दिले तक्रारीचे पत्र
सिल्वासा : दादरा नगर हवेलीच्या रखोली गावात हॅमिल्टन नावाच्या कंपनीला भीषण आग, 5 ते 7 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी, आग लागताच लोकांना कंपनीच्या बाहेर काढले, दादरा नगर हवेली आणि वापी, सरीगाव या अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी
बारामती- पुण्यातील कासुर्डी टोलनाक्यावर सात वर्षांपूर्वी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयाने सामूहिक बलात्कार, अपहरण आणि जबरी चोरी प्रकरणी बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने तीन आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पुण्यातील कासुर्डी टोलनाक्याजवळ 22 नोव्हेंबर 2012 रोजी सात वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. पीडित महिला पती आणि मुलांसह ट्रकने सोलापूरकडून पनवेलला जात होते. त्यावेळी पोलिस असल्याचे भासवून आरोपी गणेश सुभाष वैरागे, अशोक आत्माराम येडके, गौरव गंडप्पा जमादार (रा. खामगाव फाटा, दौंड, पुणे) यांनी ट्रक थांबवला. पीडित महिलेचा पती आणि मुलांना आरोपींनी चाकूच्या धाकाने केबिनमध्ये कोंडून ठेवलं. त्यानंतर तिला ट्रकच्या पाठीमागे ओढत नेऊन या तीन जणांनी आळीपाळीने बलात्कार केला होता. याप्रकरणी यवत पोलीस स्टेशन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी 13 साक्षीदार तपासण्यात आले. पोलिसांनी केलेला तपास, मिळालेले पुरावे व सरकारी वकील अॅड. एम.बी. वाडेकर यांनी केलेला युक्तीवाद मान्य करत न्यायालयाने या तिघांना आजन्म कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. आरोपींना या सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. दरम्यान पिडीत महिलेस जिल्हा पीडित महिलेला मदत केंद्राकडून नुकसान भरपाईचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
महाराष्ट्र वडार मंडळाचे अध्यक्ष आणि मनपा विरोधी पक्ष नेते असलेले शिवसेना नेते विजय चौगुले यांना खंडणीसाठी जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका निनावी पत्राद्वारे विजय चौगुलेंना ही धमकी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर धमकी आल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. धमकी देणाऱ्याने एका बंद पाकिटात चिठ्ठी लिहिली आहे. 50 लाख रूपये न दिल्यास विजय चौगुले यांचे महिलांबरोबर असलेले आक्षेपार्ह फोटो सोशल मिडयावर व्हायरल करायची धमकी आरोपीने दिली आहे. याप्रकरणी विजय चौगुले यांनी रबाले पोलीस ठाण्यात खंडणीची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नांदेडमध्ये दोन दिवसीय कुसुम महोत्सवाला सुरवात झालीय. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या श्रीजया आणि सुजया दोन्ही कन्यांनी या महोत्सवात स्टाॅल लावलाय. स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्ताने नांदेडमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.
1 मार्च रोजी पहाटे असलेल्या मेगा ब्लॉक मुळे खालील गाड्या रद्द राहतील / लेट धावतील
डहाणू कडे जाणाऱ्या -
1. विरारहून पहाटे 4.40 मिनिटांनी सुटणारी विरार - संजान मेमु रद्द राहील
2. विरारहून पहाटे 5 वाजता सुटणारी डहाणू लोकल रद्द राहील
3. विरारहून पहाटे 5.35 मिनिटांनी सुटणारी डहाणू लोकल रद्द राहील
4. चर्चगेट वरून पहाटे 4.58 मिनिटांनी सुटणारी डहाणू लोकल रद्द राहील
5. चर्चगेट वरून 5.24 मिनिटांनी चर्चगेट डहाणू लोकल आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटे उशिराने डहाणू येथे पोहचेल
मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या -
1. डहाणू येथून 7.05 मिनिटांनी सुटणारी विरार लोकल रद्द राहील
2. डहाणू येथून 7.15 मिनिटांनी सुटणारी चर्चगेट लोकल रद्द राहील
3. डहाणू येथून 8.30 मिनिटांनी सुटणारी बोरिवली लोकल रद्द राहील
4. भरुच येथून दुपारी 2.05 मिनिटांनी सुटणारी भरूच विरार मेमु सुरत येथून 4.25 मिनिटांनी सुटेल
मी सावरकर या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ शरद पोंक्षे यांच्या हस्ते पार पडतोय. याला फर्ग्युसन महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळं शरद पोंक्षे यांना महाविद्यालयाच्या मागच्या प्रवेशदाराने कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश करावा लागला. यावेळी दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी समोरासमोर येत जोरदार घोषणाबाजी केली. महाविद्यालयाच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. महाविद्यालयात नेहमी पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप हे विद्यार्थी करतायेत. दरम्यान आयोजकांनी प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं म्हणत या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिलाय.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राज्यभरातल्या 16 जागांसाठी आज 92.57 टक्के मतदान झाले. बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या सहा महसूल विभागात आणि पाच बाजार आवार आणि व्यापारी हमाल माथाडी प्रतिनिधींची ही निवडणूक होत आहे. एकूण 18 जागांपैकी 2 जागांवर बिनविरोध निवड झाली असून आज प्रत्यक्ष 16 जागांसाठी मतदान पार पडलं. त्यामध्ये सहा महसुली विभागातल्या 2 जागा आणि नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील चार जागा अशा या 16 जागा आहेत. या 16 जागांसाठी 66 उमेदवार रिंगणात होते त्याचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे. बिनविरोध निवड झालेल्या 2 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीची मतमोजणी 2 मार्च रोजी नवी मुंबईतल्या कांदा बटाटा मार्केटमधल्या लिलावगृहात होणार आहे. त्यासाठी 80 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळी आठ वाजता सुरू होणारी ही मतमोजणी दुपारी 2 वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे.
अमरावती जिल्ह्यात इटकी येथे तरुण युवकाची हत्या, दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन हद्दीतील इटकी येथे सायंकाळी 5 च्या सुमारास एका तरुण युवकाची भर रस्त्यावर हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. रुस्तम उर्फ पुरुषोत्तम बंड (वय 19) या युवकाची हत्या करण्यात आली असून ही हत्या दोघांच्या जुन्या वादातून घडल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
औरंगाबाद : वडिलांकडून होणाऱ्या सततच्या मारहाणीला कंटाळून दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलानेच बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यात उघड झाली आहे. खून केल्यानंतर गेल्या अडीच महिन्यापासून घरातच मृतदेह गाडून ठेवला होता, कन्नड तालुक्यातील जामडी घाट या गावातील ही धक्कादायक घटना, दारु पिऊन वडिलाकडून सतत मारहाण होती, अखेर कंटाळून मुलानं खून केल्याची चर्चा
चेन्नईत तेलाच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल, आगीवर नियंत्रण आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु
चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयात धक्कादायक प्रकार, 2 महिलांनी औषध आणायचे आहे असे सांगून वॉर्ड क्र. 1 मधील एका इसमाकडे सोपविली मुलगी, 5 दिवसाच्या मुलीला घेण्यासाठी महिला आल्याच नाहीत, भानुदास उईके नामक व्यक्तीने डॉक्टरांच्या स्वाधीन केली मुलगी, वॉर्डाच्या या भागात सीसीटीव्ही नसल्याने महिलांची ओळख पटवणे झाले अवघड, अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलीला अशा प्रकारे सोडल्याची चर्चा
नांदगाव : राज्याच्या काही भागात हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविलेला होता. त्यानुसार नाशिकच्या नांदगाव शहरासह तालुक्यातील काही भागात संध्याकाळच्या सुमारास हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काही काळ हवेत गारवा निर्माण झाला होता तर अचानक आलेल्या पावसाने उघड्यावर काढून ठेवलेला शेतातील कांदा काही प्रमाणात भिजला.
चिपळूण : कुंभार्ली घाटात बस चालकाला बेदम मारहाण, या घटनेविरोधात गुहागर डेपो बंद, मारहाण करणारे नाशिक येथील तरुण, गाडी घासल्याने मारहाण
अमरावती : अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तीन शालेय मुलींशी शिक्षकांचं अश्लील चाळे प्रकरण, प्रकरण सरकार गांभीर्यानं घेणार असल्याची महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूरांची अकोल्यात प्रतिक्रिया, दोषी शिक्षकांवर कारवाई करणार असल्याची माहिती
पालघर : बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात एकाच वेळी 20 श्वानांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास येथील भागात फिरत असलेले हे श्वान अचानक विव्हळत असल्याचे येथील कामगारांना दिसून आले होते. मात्र, काही क्षणात सर्वांचा अचानक मृत्यू झाला. यातच येथील व्यवस्थापकाने याबाबत कोणत्याही विभागाला न कळवताच मागील जागेत त्यांना पुरल्याचे समजते.
शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, दुसऱ्या यादीत 2 लाख 98 हजार शेतकऱ्यांचा समावेश
नाशिक : लासलगाव-चांदवड एसटी बसला अपघात. अपघातात 10 ते 15 प्रवासी किरकोळ जखमी. चांदवडच्या पिंपळस गावाजवळील घटना. एसटी बस चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात बस गेल्याने झाला अपघात. लासलगाव येथून हिरापूर उर्धुळ मार्गे चांदवड या ठिकाणी ही बस जात होती.
मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती, आयुक्त संजय बर्वे यांच्या निवृत्तीनंतर परमबीर सिंह यांची नियुक्ती
बीड : राष्ट्रीय कीर्तनकार तथा ह.भ.प. भरतबुवा रामदासी यांचे हृदविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 57 वर्षाचे होते. ख्यातनाम कीर्तनकार म्हणून त्यांचा नावलौकिक होता. मूळ गेवराई तालुक्यातील रुई धानोरा या गावचे रहिवासी असलेले भरतबुवा यांचे देशभरात नाव होते. गुजरात, मध्यप्रदेश, बिहार, दिल्ली यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे कीर्तन लोकप्रिय होते. प्रचंड व्यासंग, अभ्यासपूर्ण मांडणी, साहित्य, इतिहास याविषयावरील त्यांचे ज्ञान वादातीत होते. त्यांच्या वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द हा प्रमाण होता. संत साहित्य तसेच इतिहास कालीन विषयावर त्यांची हजारो कीर्तने गाजलेली आहेत.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांची मुंबईत अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील यांच्यासमवेत बैठक सुरू आहे. राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, अॅड. शिंदे, मराठा आरक्षण कामकाज उपसमितीचे सचिव शिवाजी जोंधळे, उपसचिव गुरव आदी अधिकारी देखील उपस्थित आहेत.
गोवा : उकड्याने जीव हैराण झालेला असताना पणजी वेधशाळेने दुपारी पावणे एक वाजता बुलेटिन जारी केलंय. दक्षिण गोव्यातील केपे आणि काणकोण तालुक्यात पुढील तीन तासात एखाद दुसऱ्या ठिकाणी गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवला आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याचे वृत्त आहे. केपे आणि काणकोण तालुक्यावर पावसाचे ढग जमले आहेत.
मुस्लीम आरक्षणाला शिवसेनेचं समर्थन, मंत्री एकनाथ शिंदेंनी नवाब मलिक यांच्या घोषणेला दिला पाठींबा.
शहिद विलास शिंदे यांची हत्या करणाऱ्या अहमद मोहम्मदअली कुरेशीला जन्मठेपेची शिक्षा. मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय. कलम 302 च्या अंर्तगत कोर्टानं सुनावली जन्मठेप आणि 50 हजारांची शिक्षा. दंडाच्या रकमेतील 45 हजार शहिद शिंदेच्या पत्नीला देण्याचे निर्देश.
पिंपरी चिंचवडमध्ये मिसाईलच्या बुलेट आढळल्या आहेत. लष्कराच्या हद्दीतून या बुलेट बाहेर कशा काय आल्या? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय. एकूण चार मिसाईल बुलेट असून त्या गंजलेल्या अवस्थेत आहेत, त्यात कोणताही दारुगोळा नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. चाफेकर चौकातील भंगाराच्या दुकानाशेजारी या मिसाईल बुलेट आढळल्या. या बुलेट कोणत्या भंगार मालकाने, कोठून, कोणाकडून आणि कधी विकत घेतल्या याचा तपास चिंचवड पोलीस करत आहेत.
मुंबई : भाजपकडून मुंबई महापालिका 2022 च्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू. पालिकेत भाजपकडून केले जात आहेत मोठे फेर बदल. मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपने ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि भाजपच्या महापालिका गटनेतेपदासाठी विनोद मिश्रा यांचे नाव जाहीर केल्यानंतर पक्षाने आणखी मोठा बदल केला आहे.
अमरावती : मोहाच्या झाडाखाली देव असल्याच्या भावनेतून अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील भेमडी गावात भाविकांची मोठी गर्दी उसळली. या गावातील एका 25 वर्षीय युवकाला काही दिवसांपूर्वी एक स्वप्न पडले की गावातील मोहाच्या झाडाखाली भगवान शंकर आणि माता पार्वतीचे वास्तव्य असल्याचा दृष्टांत त्याला स्वप्नातून झाला. मग काय गावकऱ्यांनी सुरू केली त्या झाडाची पूजा. ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि आता हळूहळू गावाच्या आजूबाजूचे लोकं तिथे येऊन पूजा करायला लागले. आता भेमडी गावातील त्या झाडाच्या परिसराला शिवरात्रीला जत्रेचे स्वरूप आले होते. सध्या दिवसभरातून अनेक लोकं याठिकाणी दर्शनासाठी येताय.
गोवा : रासायनिक प्रक्रिया करून फळे पिकवून बाजारात विकणाऱ्या दुकानदारांवर अन्न आणि औषध प्रशासनाने कडक कारवाई सुरु केली आहे. काल म्हापशात आणि आज पणजी मार्केट मध्ये धाड टाकून रासायनिक प्रक्रिया केलेली फळे जप्त करून ती नष्ट करण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासनाने आज पणजी मनपाचे महापौर उदय मडकईकर आणि मनपा बाजार निरीक्षकांच्या उपस्थितीत आज पणजी मार्केट मधील फळ विक्रेत्यांची अचानक तपासणी करून खराब झालेली आणि रासायनिक प्रक्रिया करून पिकवलेली फळे जप्त करून ती नष्ट केली. काही ठिकाणची सँपल देखील घेण्यात आली आहेत.
धुळे : शिरूड येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीम चोरट्यांनी पिकअप व्हॅनमध्ये टाकून पळवले. रात्री दोन वाजून 20 मिनिटांची घटना. ब्लँकेट पांघरून चार जणांनी एटीएम मशिन मधील 13लाखाच्या रोकडसह एटीएम मशिनच पळवलं. घटना सिटीव्हीत कैद .सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घेतलं ताब्यात. काही महिन्यांपूर्वी याच एटीएमच्या ठिकाणी चोरट्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला होता.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांडातील आरोपी विकी उर्फ विकेश नगराळेविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. जळीतकांडाच्या घटनेनंतर 26 व्या दिवशी 426 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. हिंगणघाटमध्ये शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं. पीडितेचा उपचारादरम्यान नागपुरातील रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विकेश नगराळेला अटक केली. प्रकरणाचा तपास उपविभाग पोलीस अधिकारी तृप्ती जाधव करत आहेत. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत पुरावे गोळा करण्यात आले. त्यानंतर सबळ पुराव्यानिशी हिंगणघाट येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं.
तेहरानला अडकलेले मुस्लीम भाविकांच्या परतीसाठी आज भारतीय दुतावासात मुन्ना शेख व इतर मंडळी गेली. मात्र, दुतावासातील काही आधिकारी देखील सुट्टीला गेलेले विविध देशात अडकले असल्याने आता त्यांना अडकलेल्या भाविकांची यादी मेल करण्याच्या सुचना दुतावासाने दिल्या आहेत. एबीपी माझाने बातमी घेतल्यानंतर आता या भाविकांच्या परतीच्या प्रयत्नाला वेग आला आहे.
मुंबई पोलीस आयु्क्त संजय बर्वे आज सेवानिवृत्त होणार, मुंबई पोलिसांकडून निरोप समारंभाचं आयोजन
औरंगाबाद : रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार शहरातील सर्वसामान्य नागरिकही करु शकतो. त्याने केलेल्या तक्रारीनंतर दहा दिवसात खड्डा बुजवला नाही तर पोलीस विभागाने तीन दिवसात चौकशी करुन गुन्हा दाखल करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आहे. शहरातील रस्त्यांच्या दूरवस्थेसंदर्भात पार्टी इन पर्सन ऍड. रुपेश जैस्वाल यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर खंडपीठाने हा आदेश दिला. यासाठी पोलीस खात्याने दोन ई-मेल आयडी, दोन व्हॉट्सअॅप नंबर आणि दोन ट्विटर हॅण्डल दिले आहेत, ज्यावर लोक तक्रार करु शकतात. तर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडाळानेही हेल्पलाईन नंबर दिला आहे.
अहमदनगर : जिल्ह्यातील पाथर्डी येथील तिसरीत शिकणाऱ्या मुलाने शेतकरी आत्महत्या करू अशी कविता म्हटली आणि अवघ्या तीन तासातच त्याच्याच वडिलांनी आत्महत्या केलेली घटना घडली. या ह्रदयद्रावक घटनेबद्द्ल कृषिमंत्री दादा भुसे यांनी दुःख व्यक्त केले असून, शेतकरी आत्महत्या सर्वांसाठी दु:खद घटना आहे. मुख्यमंत्र्यांनाही त्याचे दुःख आहे. कितीही कठीण प्रसंग असला तरी शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन भुसे यांनी केले. कठीण समयी सरकार शेतकऱ्यांसोबत आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार उपाय योजना करीत असून पाथर्डीच्या घटनेचा कृषिविभागाकडून लवकरच अहवाल मागवून चौकशी करण्यात आश्वासन भुसे यांनी दिले.
परभणी : बारावीच्या परीक्षेतील शिक्षकाकडून उत्तरं सांगितल्याचं प्रकरण. शिक्षण मंत्री आणि विभागीय शिक्षण मंडळाची दिशाभूल. थेट परभणीच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून दिशाभूल. दिशाभूल केल्याप्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस. शिक्षणाधिकाऱ्यांनी उपद्रवी केंद्रांची यादीच पाठवली नाही. त्या परीक्षा केंद्रांवर कारवाई ही केली नाही. तीन दिवसात खुलासा करण्याचे निर्देश.
पुणे : येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने पॅरोलवर बाहेर पडल्यावर शिक्षेतुन कायमची सुटका होण्यासाठी केला स्वतःच्या मृत्युचा दाखला. पोलीसांकडून चौघांवर केला गुन्हा दाखल.
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. जागतिक अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका, भीतीमुळे परदेशवारींचं बुकिंग कॅन्सल, हज यात्रेकरुही परत, सोनंही महागण्याची शक्यता
2. मुस्लीम आरक्षण ओबीसीसह मराठा आरक्षणासाठी धोकादायक, देवेंद्र फडणवीसांकडून भीती व्यक्त, मुस्लीम आरक्षणासाठी ठाकरे सरकार अध्यादेश काढणार
3. मुंबईत 9 मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश, दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून सतर्कता
4. अकोला मुली बेपत्ता प्रकरणी अकोला पोलीस अधीक्षक अमोघ गावकरांची बदली, तर दोन तपास अधिकाऱ्यांचं निलंबन, माझाच्या बातमीनंतर गृहमंत्र्यांची कारवाई
5. अर्थसंकल्पात 600 कोटींची तरतूद करुनही पुण्यात कचराकोंडी, फुरसुंगीच्या रहिवाशांचं आंदोलन कायम, प्रकरण गळ्याशी येताच पालिकेकडून कंत्राटाची घाई
6. विदर्भात आज आणि उद्या गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता, तर मराठवाड्यात हलक्या सरी, हवामान खात्याचा अंदाज
एबीपी माझा वेब टीम