LIVE UPDATES | भिवंडी शहरातील खोका कंपाऊंड परिसरात भंगाराच्या गोदमला भीषण आग
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
23 Feb 2020 10:32 PM
वर्धा : भरधाव कारची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू, जामकडून खंडाळा गावाकडे दुचाकी वळण घेताना दिली कारने धडक, नागपूर-जाम मार्गावरील खंडाळा शिवारात 7.30 वाजताच्या सुमारास घडला अपघात
भिवंडी : भिवंडी शहरातील खोका कंपाऊंड परिसरात भंगाराच्या गोदमला भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल. आगीचे कारण अस्पष्ट. एका महिन्यात खोका कंपाऊंड परिसरात आगीची तिसरी घटना.
बीड : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. मंडप स्टेशनरी फाईली वरती कोट्यावधी रुपये खर्च केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी पाच सदस्यीय समिती ही बीडमध्ये चौकशीसाठी आली होती. मात्र, या चौकशी समिती समोरच काही बोलाल तर तुमचीच चौकशी सुरू करेल, अशी धमकी बीडच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धरमकर यांनी दिल्याचे एका तहसीलदाराने विभागीय आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करणार, तीन महिन्यात कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करु : उद्धव ठाकरे
आंध्र प्रदेशातील #दिशा कायद्याची माहिती घेतली असून महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर निर्णय घेणार आहे : गृहमंत्री अनिल देशमुख
वर्धा : भरधाव कारची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू, जामकडून खंडाळा गावाकडे दुचाकी वळण घेताना दिली कारने धडक, नागपूर-जाम मार्गावरील खंडाळा शिवारात 7.30 वाजताच्या सुमारास घडला अपघात
स्वतः काही करायचं नाही, आणि आम्ही केलेल्या चांगल्या गोष्टींवर टीका करायची, अशी भूमिका विरोधी पक्षाची आहे. त्यामुळे विरोधकांच्या सर्वच प्रश्नांची उत्तर देण्याची गरज वाटत नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडीची पत्रकार परिषद. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती
नागरिकत्व(सीएए)कायद्याबद्दल गैरसमज आहे, देशातल्या कुठल्याही नागरिकाला बाहेर काढण्याचा विषय नाही : नितीन गडकरी
अकोला : प्रहार संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या हत्येची चौकशी सीआयडीमार्फत करा, चळवळीतील कार्यकर्त्यांना सरकारने संरक्षण द्यावं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांची मागणी. अकोटमध्ये घेतली तुषार पुंडकर यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकासआघाडीची बैठक, तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न, तर चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार
शिर्डी : चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीचा शेतात खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळला आहे. जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एकरुखे गावात ही घटना घडली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर पती सुनील लेंडे हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीचा खून केल्याची कबुली त्यानं पोलिसांकडे दिली. लेंडेविरुध्द खूनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.
दिल्लीतील जाफराबादमध्ये CAA विरोधात आंदोलन सुरू असताना दोन गटात दगडफेक.
रायगड : रायगड रोप वे तांत्रिक देखभाल आणि दुरूस्तीसाठी 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत बंद राहील. पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी रोप वे प्रशासनाकडुन निवेदन देण्यात आले आहे.
वसई : मुंबई अहमदाबाद महामार्गावर डांबरच्या ऑइल टँकर आणि एसटी बसचा अपघात झाला आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग येथील वसई हद्दीत सातीवली चढणवर अहमदाबाद लेनवर आज दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला आहे. भराधाव वेगात जाणाऱ्या एसटीने मागून डांबरच्या ऑइल टँकरला जोराची धडक दिली आहे. यात सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र, यात बसची पुढील बाजू क्षतिग्रस्त झाली आहे, तर तर टँकरचे डांबर ऑइल मागील ठिकाणाहून लिकेज होऊन महामार्गावरील रस्त्यावर आले आहे.
80 वर्षांचा असलो तरी मन अजूनही तरूण : शरद पवार
अभ्यास सोडून मी सर्व विषयांत पारंगत होतो : शरद पवार
युवा संवाद कार्यक्रमात शरद पवार यांची मुलाखत
मुंबईतील आझाद मैदानावर जवळपास महिनाभरापासून आंदोलनाला बसलेल्या मराठा आंदोलकांना रस्त्यावर झोपण्याची वेळ आल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती. या बातमीची दखल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी घेतलीय. काळाचौकीतील कमलाबाई मोरे सभागृहात या आंदोलकांची राहण्याची सोय नितेश राणे यांनी केलीय. आझाद मैदानावरील या आंदोलनाकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येतय. त्याचबरोबर त्यांना आमदार निवास सोडण्याची सूचना केली. त्यामुळं या आंदोलनांवर रस्त्यावर झोपण्याची वेळ आली होती. तशी बातमी एबीपी माझानं काल दाखवली होती.
बंगळुरू विमानतळावरून ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. कॅम्पगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळवरून जवळपास पाच किलो एफिड्रिन ड्रग्स जप्त करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किंमत सुमारे पाच कोटी असल्याचे सांगण्यात येतं. लग्नाच्या पत्रिकेत ड्रग्स लपवून ही तस्करी करण्यात येत होती. 43 लग्नाच्या पत्रिकेत 86 पाऊचमध्ये लपवलेलं ड्रग्स कस्टम विभागाच्या हातील लागलंय. मदुराईचा एक व्यापारी ऑस्ट्रेलियाला हे ड्रग्स पाठवत होता.
एकतर्फी प्रेमातून 24 वर्षीय महिलेला डोक्यात दगड घालून मारण्याचा प्रयत्न, महिला गंभीर जखमी, पिडितेवर बीडच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू, पोलीस घटनास्थळी दाखल
अंडरवर्ल्ड डॉन रवि पुजारीला आफ्रिका खंडातील सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. तिथून त्याला आज भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे. पुजारीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती मिळतेय. पुजारीला रॉ आणि कर्नाटक पोलिसांच्या संयुक्त पथकानं पश्चिम आफ्रिकेतील सेनेगलमध्ये अटक केली. भारतात आणल्यानंतर पुजारी कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात राहिल. रवि पुजारी सेनेगलमध्ये एँटोनी फर्नांडिस नावाने पासपोर्ट बनवून राहत होता. अखेरच्या वेळी पुजारी सेनेगलमधूनच फरार झाला होता.
सोमवारपासून राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आहे. याच पार्श्वभूमीवर आज बैठकांचं सत्र पाहायला मिळेल. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या बैठका पार पडतील. फडणवीस सरकारच्या काळातील काही मंत्र्याच्या कथित घोटाळ्यांची प्रकरणे समोर आणण्याची रणनिती सत्तारुढ महाविकास आघाडीने आखली आहे. आजच्या बैठकीत त्यावर खलबतं होण्याची शक्यता आहे. तर सरकारला विविध मुद्यांवरून कोंडीत पकडण्याची तयारी विरोधी पक्षाने आखली आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर संबोधित करणार आहेत.
निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या समर्थनात आज अकोले बंद पुकारण्यात आला आहे. भूमाता ब्रीगेडच्या तृप्ती देसाई यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे. देसाई यांनी इंदोरीकरांना काळं फासण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. सम-विषमच्या वादानंतर इंदुरीकरांनी दिलगिरी व्यक्त केलीय. तरीही देसाईंनी अशाप्रकारचं वक्तव्य केल्यानं अकोलेकर संतप्त झाले आहेत. इंदोरी ते अकोले मोटारसायकल रॅली, गावातून भजन दिंडी आणि निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
ENBA पुरस्कारात एबीपी माझाचा डंका पाहायला मिळालाय. सर्वोत्कृष्ट वृत्तनिवेदक, सर्वोत्कृष्ट कार्यक्रम आणि सर्वोत्कृष्ट कव्हरेजसाठीही माझाला एकूण 17 पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. उत्कृष्ट कार्यक्रमासाठीचा पुरस्कार पोस्टमन माझा या कार्यक्रमाला मिळालाय. तर सांगली आणि कोल्हापूर पुराच्या वेळी केलेल्या वार्तांकनाला उत्कृष्ट वार्तांकनाचा पुरस्कार मिळालाय. उत्कृष्ट वृत्तनिवेदक म्हणून माझाचे उस्मानाबादचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आणि अभिजीत करंडे यांना गौरवण्यात आलं आहे.
परवडणारी घरं बांधण्याची गरज असल्याचं मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते. गृहनिर्माण क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देण्याची ताकद असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. देशातल्या आर्थिक मंदीचा फटका विकासकांनाही बसल्याचं ते म्हणाले.
भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणार का, अशा प्रश्न विचारला जात असताना आता शिवसेना भाजपची हाक ऐकणार नाही, असं वक्तव्य उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केलं आहे. 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपनं शिवसेनेला खोटं पाडण्याचा प्रतत्न केला नसता तर राज्यात चित्र वेगळं दिसलं असतं, असंही देसाई म्हणाले आहेत.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी फक्त बोलू नका, तर भाजपचे 10 आमदार तरी फोडून दाखवा, असं थेट आव्हान सत्ताधाऱ्यांना दिलं आहे. 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात बोलताना भाजप सरकारच्या काळातील वृक्षलागवडीची चौकशी करुन दाखवा, असंही मुनगंटीवार म्हणालेत.
सत्तांतरानंतर भाजपात गेलेले नेते अस्वस्थ असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. त्यावेळी राधाकृष्ण विखे-पाटलांचं नाव न घेता थोरातांनी जोरदार टोला हाणला. 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या दोन माजी आमदारांनी वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकला आहे. तसेच राज्यभरातील 48 पदाधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे. पक्षावरचा विश्वास संपल्यामुळे राजीनामा देत असल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. राजीनामा देण्याऱ्या माजी आमदारांमध्ये हरिदास भदे आणि बळीराम सिरस्करांचा समावेश आहे.
महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे चालणार असा ठाम विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन'मध्ये व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांचा स्वभाव सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे आणि त्याचं मार्गक्रमण योग्य मार्गानं सुरू असल्याचंही म्हटलं आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्या हाती नाही, असं स्पष्टीकरण देखील माझाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी दिलं आहे.
उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यादरम्यान सीएए आणि एनआरपीला समर्थन असल्याचं स्पष्ट केल्यानंतर ठाकरेंच्या भूमिकेवर काँग्रेस नेत्यांनी आक्षेप नोंदवला. त्यानंतर महाविकास आघाडीतली धुसफूस समोर आली असून याची दखल आता शरद पवारांनी घेतली आहे. कारण वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यात सीएए आणि एनपीआरवर चर्चा झाली. या कायद्यासंदर्भात तिन्ही पक्षातील नेते आढावा घेणार असल्याचं या बैठकीत ठरलं आहे. कायद्यात ज्या बाबींवर आक्षेप आहे. त्या केंद्राला कळवण्यात येणार आहे. तसेच 5 मार्चपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वादग्रस्त आणि अडचणीचे विषय टाळण्यावर एकमत झालं आहे.
पार्श्वभूमी
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...
1. सीएएवरुन महाविकास आघाडीत सुरू झालेल्या धुसफुसीची पवारांकडून दखल, वर्षावर मुख्यमंत्र्यांशी खलबतं, वादग्रस्त वक्तव्य टाळण्यावर एकमत
2. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची आज बैठक, दुपारी पत्रकार परिषद होणार
3. 15 कोटी 100 कोटींवर नव्हे तर भाजपातल्या शंभरांवर भारी, चिथावणीखोर वक्तव्यावर वारिस पठणांची शब्दांची कोटी, वादग्रस्त वक्तव्यही मागे
4. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून विशिष्ट भाग वगळण्याचं कोणतंही आश्वासन दिलेलं नाही, कोल्हेंची प्रतिक्रिया, छळाचा प्रसंग न दाखवण्याच्या खोतकरांचं आवाहन
5. रेल्वेत नोकरी लावण्याचं आमिष देऊन 96 लाखांची फसवणूक, मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता, घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6. ENB पुरस्कारात एबीपी माझाचा डंका, सर्वोत्कृष्ट वृत्तनिवेदक, सर्वोत्कृष्ट कार्यक्रमासाठी पुरस्कार, पूरपरिस्थितीतील सर्वोत्कृष्ट कव्हरेजसाठीही माझाचा गौरव
एबीपी माझा वेब टीम