LIVE UPDATES | पुणे कँटोन्मेंटमधील कर्मचारी आणि रहिवाशांना हायकोर्टाचा दिलासा

राज्यातील आणि देश विदेशातील घडामोडींचा वेगवान आढावा...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Mar 2020 11:16 PM
पुणे कँटोन्मेंटमधील कर्मचारी आणि रहिवाश्यांना हायकोर्टाचा दिलासा. 'कोरोनाचं थैमान सुरू असताना जीएसटी परताव्यासाठी एकमेकांकडे बोटं दाखवू नका', राज्य आणि केंद्र सरकारला हायकोर्टाचे खडे बोल. तातडीनं एक कोटी रूपये कँटोन्मेंट बोर्डाकडे जमा करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश
अमरावती - चांदूर बाजार तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, गहू, संत्रा, हरभरा पिकांचे नुकसान, अकोल्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरूवात
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील वगळलेल्या 18 गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

वगळण्यात आलेली गावे पुढील प्रमाणे- घेसर, हेदूटणे, उंब्रोली, भाल, द्धारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा व कोळे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील उर्वरित 9 गावे पुढील प्रमाणे- आजदे, सागाव, नांदिवली पंचानंद, धारिवली, संदप, उसरघर, काटई, भोपर व देसलेपाडा.

कोकण विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या अभिप्रायावरुन वरीलप्रमाणे स्वतंत्र नगरपरिषदेचा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ हे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात समाविष्ट करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

सर्व मुलांना एकसमान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे शासनाचे धोरण असताना काही मोजक्या मुलांसाठीच उच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण करण्याकरिता संलग्नता देणे योग्य आहे का असा आक्षेप घेण्यात आला. कोणत्याही नवीन अभ्यासक्रमास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे पण तसे करण्यात आले नाही. राज्याची दोन परीक्षा मंडळे असू नयेत असे शालेय शिक्षण विभागाचे मत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील सर्व शाळांसाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार करण्याचे ठरले.
LIVE UPDATES : कोल्हाूरच्या गगनबावडा तालुक्यात मुसळधार पाऊस, कोल्हापूरच्या ग्रामीण भागात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस
वाशिम जिल्ह्यात मंगरुळपीर मालेगाव तालुक्यात अनेक भागात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसा गारपीट झाली. त्यामुळे काढणीस आलेल्या पिकाचं तसेच संत्रा, आंबा पिकाचा मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे
नवी मुंबई, वसई-विरार आणि औरंगाबाद महापालिका निवडणूक, जिल्हा परिषद आणि नगरपालिका पोटनिवडणुक स्थगित
जालना-जिल्ह्यातील, बदनापूर, घनसावंगी, जाफराबाद या तीन तालुक्यातील काही गावात गारांचा पाऊस
मध्य प्रदेश विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव होणार नाही. शिवराज सिंह आणि भाजपच्या नऊ आमदारांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची सरकारला नोटीस, याचिकेवर उद्या सकाळी १०.३० वाजता सुनावणी होणार, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्रीस राज्यपाल कार्यालयाला नोटीस
दहा दिवसांत जवळपास पाच हजारांनी सोन्याच्या किंमतीत घट, सोन्याचा आजचा दर जीएसटी मिळवून रूपये 39661 प्रतितोळा
ज्येष्ठ चरित्र अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन
ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी (88 वर्षे) यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले आहे. दुपारी 12 वाजता वैकुंठ स्मशनाभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दे दणादण, थरथराट, झपाटलेला, बाळाचे बाप ब्रम्हचारी यासारख्या चित्रपटात काम केले आहे.
औरंगाबादमध्ये अभियंता तरुणाची चाकूने भोकसून हत्या, अक्षय प्रधान अस मृत तरुणाचे नाव, शहरातील संग्रामनगर परिसरातील रात्रीची घटना, मोबाईल न दिल्याने चाकूने वार

चंद्रपूर शहरातील शासकीय विश्रामगृहासमोर अस्वलीचे दर्शन, शहरातील वर्दळीच्या मुख्य मार्गावर अस्वल फिरताना दिसल्याने खळबळ

पार्श्वभूमी

देश विदेशातील घडामोडींचा वेगवान आढावा... 

1. महाराष्ट्रात पुढचे 15 दिवस कसोटीचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन, राज्यभरातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 39 वर

2. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद, महाविद्यालयांच्या परीक्षा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलल्या, निवडणुकाही पुढे जाण्याची शक्यता

3. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं 3 दिवस बंद, किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांचा निर्णय, फक्त जीवनावश्यक वस्तू आणि औषधांची दुकानं चालू राहणार

4. कॅशद्वारे व्यवहार टाळा, नोटांमधून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेचा सल्ला, डिजिटल व्यवहार करण्याचा आग्रह

5. कोरोना संशयिताच्या हातावर यापुढे शिक्का मारला जाणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती, रुग्णाची ओळख पटावी यासाठी सरकारची खबरदारी

6. पिंपरीतून पळालेला कोरोनाचा रुग्ण पुन्हा रुग्णालयात, फिल्मी स्टाईलनं पोलिसांकडून रुग्णाचा ताबा, तर खारघरच्या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये संशयितांचा बिनधास्त वावर

7. राज्यभरातल्या मंदिरांना कोरोनाचा धसका, सिद्धिविनायक आणि तुळजाभवानीचं दर्शन बंद, पुण्याच्या दगडूशेठ मंदिरात शुकशुकाट, वणी गडावरचा चैत्रोत्सव रद्द

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.