एक्स्प्लोर

भगवानगडाला पोलिस छावणीचं स्वरुप, मेळाव्याचं ड्रोनने शूटिंग!

अहमदनगर : दसऱ्यानिमित्त होणाऱ्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर भगवानगडावर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. 1 अतिरिक्त पोलिस अधीक्षक, तीन उपअधीक्षक, 11 पोलिस निरीक्षक, 21 सहाय्यक निरीक्षक, फौजदार, 325 पोलिस कर्मचारी, 75 महिला पोलिस, दोन आरसीपी प्लाटून, दोन राखीव पोलिस दलाच्या तुकड्या, याशिवाय बाहेरच्या जिल्ह्यातून फौजफाटा मागवण्यात आला आहे.

पंकजांचं भाषण होणारच, शास्त्रींना 25 ग्रामपंचायतींचं आव्हान

पंकजा आणि शास्त्रींमधील वाद कायम पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी काल भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याशी बातचीत करुन प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने वाद कायम आहे.

नामदेव शास्त्री आणि पत्रकारातील संभाषण जसेच्या तसे

विशेष पोलिस पथकाच्या जवानांनी महंताच्या दालनाला वेढा दिला आहे. तसंच पाण्याचा फवारा मारणाऱ्या गाड्याही भगवानगडावर तैनात केल्या आहेत. शस्त्रधारी शीघ्र कृती दल, राज्य राखीव दल, विशेष पोलिस दल तैनात करण्यात आले आहेत. मेळाव्याचं ड्रोन कॅमेऱ्याने शूटिंग याशिवाय पूर्वीच्याच जागी तीन हेलिकॉप्टर उतरण्याची सुविधा केली आहे. गडावरील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस ड्रोन कॅमेऱ्याने मेळाव्याचं शूटिंग करणार आहेत. पंकजा मुंडे गडावर असेपर्यंत भगवानबाबाच्या समाधीचं रांगेतून दर्शन देण्यासाठी विशेष दर्शन बारीची तयार करण्यात आली.

एखाद्याला फाडून खाईन इतकी ताकद आहे माझीः नामदेव शास्त्री

1000हून अधिक जणांना जमावबंदीची नोटीस याशिवाय भगवानगड परिसराच्या 14 गावातील 1000 हून अधिक जणांना कलम 149 अन्वये जमावबंदीची नोटीस बजावण्यात आली आहे

भगवान गड वादः नामदेव शास्त्रींचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

अनुचित घटना न घडण्याची शपथ दसऱ्याच्या निमित्ताने रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समता परिषद, रिपाइंचे हजारो कार्यकर्ते गडावर येणार आहेत. गडावर कोणतीही अनुचित घटना न घडू देण्याची शपथ कार्यकर्त्यांनी घेतली आहे, अशी माहिती भाजपचे सरचिटणीस गोविंद केंद्रे यांनी दिली आहे. संबंधित बातम्याः

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडून भगवान गडावरील सुरक्षेचा आढावा

पंकजा खरं बोलल्या, हा घ्या पुरावा : धनंजय मुंडे

पंकजा मुंडे यांची कथित ऑडिओ क्लिप जशीच्या तशी

ती क्लीप ऐकून धक्का बसला, पंकजांनी सत्तेचा दुरुपयोग करु नये: नामदेवशास्त्री

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Investment Summit : महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
2 October NO UPI Day : 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
Maharashtra Drought : आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
जबाबदारी अकादमीची होती, मुलांना खोल पाण्यात का जाऊ दिले? महाजनांचा सवाल, अकादमीची चौकशी करणार, दोषींवर कठोर कारवाई होणार
जबाबदारी अकादमीची होती, मुलांना खोल पाण्यात का जाऊ दिले? महाजनांचा सवाल, अकादमीची चौकशी करणार, दोषींवर कठोर कारवाई होणार

व्हिडीओ

Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Investment Summit : महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
महाराष्ट्रात 5 वर्षांतला सर्वात मोठा धमाका! 8.57 लाख कोटींचे 67 सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगारांची निर्मिती
2 October NO UPI Day : 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
2 ऑक्टोबरला महाराष्ट्रात यूपीआय बंद, व्यापारी फक्त कॅश व्यवहार स्वीकारणार; 'हे' आहे मुख्य कारण
Maharashtra Drought : आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
Embed widget