भंडारा : भंडाऱ्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकणी जोरदार पावसामुळे दुर्घटना घडल्या. भंडारा तालुक्यातील राजेदहेगावत घर कोसळण्याची घटना घडली. खंडाते कुटुंबीयांचं घर कोसळून, घरातील तिघांचा मृत्यू झाला.
खंडाते कुटुंबातील स्कूरु खंडाते (वय 32 वर्षे), सारिका खंडाते (वय 28 वर्षे) आणि सुनुक्यान्या खंडाते (वय 3 वर्षे) यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
सतर्कता बाळगण्याचं प्रशासनाचं आवाहन
पावसामुळे नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यामुळे सुरेवाडा-खमारी रस्त्याच्या नाल्यावरुन पाणी वाहत असल्याने रस्ता बंद आहे, तर अड्याळ-विरली खंदार, अड्याळ-सोनेगाव, भावड-बेलाटी, भावड-खैरी बडोदा या मार्गावर असलेल्या पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे लोकांनी सतर्कता बाळगावी, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने आवाहन केले आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला सुट्टी जाहीर केली आहे.
मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी शिरले आहे. शिवाय, भंडारा शहरातील खात रोडवर पाणी साचल्याने लोकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे, म्हाडा कॉलनी, समृद्धी नगर या परिसरात लोकांच्या घरात पाणी शिरला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजाने येत्या 24 तासात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे
गेल्या 24 तासात भंडाऱ्यातील कुठल्या तालुक्यात किती पाऊस पडला?
लाखनी - 185 मिमी
भंडारा - 154 मिमी
मोहाडी - 116 मिमी
तुमसर - 98 मिमी
साकोली - 90 मिमी
लाखांदूर - 78 मिमी
पवनी - 74 मिमी
गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडले!
भंडाऱ्यात एक जून ते आजपर्यंत 854 मिमी इतका पाऊस पडला आहे. गोसेखुर्द धरणाचे 33 दारं एक मीटरने उघडण्यात आले आहेत. यामधून 2,44,309 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणाचे दार उघडल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भंडाऱ्यात पावसाचा धुमाकूळ, घर कोसळून तिघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Aug 2018 11:45 AM (IST)
भंडाऱ्यात एक जून ते आजपर्यंत 854 मिमी इतका पाऊस पडला आहे. या गोसे धरणाचे 33 दारं एक मीटरने उघडण्यात आले आहेत. यामधून 2,44,309 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -