उस्मानाबाद: दोन दिवसाच्या उघडपीनंतर मराठवाड्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु झाला आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली या पाच जिल्ह्यात पुढच्या 24 तासात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.
हिंगोली शहराजवळून वाहणाऱ्या कयाधू नदीला पूर आला आहे. या पावसामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत होईल. सोयाबीन पिकाचे चांगले उत्पादन होईल.
मध्यंतरी 22 दिवस पाऊस न पडल्यामुळे ऐन शेंगा भरण्याच्या काळात सोयाबीनच्या पिकाचे नुकसान होईल अशी अवस्था आली होती. परंतु दोन दिवसांपूर्वी सलग 48 तास सुमारे शंभर मिलीमीटरहून अधिक पाऊस पाण्यामुळे सोयाबीनला जीवदान मिळालं.
आज पुन्हा सुरु झालेला पाऊस असाच सुरु राहिला तर नदी, छोटे नाले ओढे यांना पाणी येऊन धरणांमधील पाणीसाठा वाढेल.
आणखी दोन दिवस जोरदार पावसाचे
विदर्भ आणि कोकणात गेल्या दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली. मराठवाड्यातही जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. खरिप पिकांचा हा वाढीचा महत्त्वाचा काळ आहे. अशा वेळी शेतात पाणी साचून राहील्यानं पिकाचं नुकसान होऊ शकतं. आणखी दोन दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर दक्षिण कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.