तवेरा ओढ्यात पडून वाहून गेली, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 21 Aug 2018 11:44 AM (IST)
तवेरा कार ओढ्यात पडून नांदेडमध्ये झालेल्या अपघातात दिवटे दाम्पत्यासह पाच वर्षांच्या चिमुरडीला प्राण गमवावे लागले.
नांदेड : नांदेडमध्ये तवेरा कार ओढ्यात वाहून गेल्यामुळे एकाच कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू झाला. अपघातात दिवटे दाम्पत्यासह पाच वर्षांच्या चिमुरडीला प्राण गमवावे लागले. नांदेडमधील नायगाव तालुक्यातील मांजरम गावात ही घटना घडली. दिवटे कुटुंबातील तिघे जण तवेरा गाडीने प्रवास करत होते. त्यावेळी गाडी ओढ्यात पडून वाहून गेली. सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली, मात्र हा अपघात नेमका कसा घडला, हे अद्याप समजू शकलेलं नाही. गावकऱ्यांच्या मदतीने रात्रीच गाडी आणि त्यातील तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. 45 वर्षीय बाबूशा दिवटे, 40 वर्षीय पारुबाई दिवटे आणि पाच वर्षांच्या अनुसया दिवटे यांचा अपघातात मृत्यू झाला. तिघेही मयत नायगाव तालुक्यातील बरबडा गावचे रहिवाशी होते.