एक्स्प्लोर
फेसबुकवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी
'काल अजित दादा वाचले आता 4 फेब्रुवारीला साताऱ्यात होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह 40 हजार लोकांचा खात्मा.'
सातारा : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार काल वाचले आता साताऱ्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करणार, अशी धमकी पंकज कुंभार नावाच्या व्यक्तीने दिली आहे. त्याने त्याच्या फेसबुक अकांउटवर या धमकीची पोस्ट टाकली आहे.
संबंधित पोस्टमध्ये पंकज कुंभारने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या कालच्या सभेच्या ठिकाणी उपस्थित असलेला त्याचा फोटो शेअर केला आहे. त्याने त्याच्या फेसबुक अणखी काही फोटो शेअर केले आहे. ज्यात त्याने लिहलं आहे, 'काल अजित दादा वाचले आता 4 फेब्रुवारीला साताऱ्यात होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह 40 हजार लोकांचा खात्मा.' या पोस्टची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित कुंभार कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविध पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर चिखलफेक करताना दिसत आहेत. भाजपाच्या पकंजा मुंडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे पोस्ट टाकणाऱ्याला शोधून संबंधित नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मार दिला होता.
अशात मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकीची पोस्ट टाकण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत तपास सुरु केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
Advertisement