मुंबई : लॉकडाऊन झाल्यानंतर पोल्ट्री व्यवसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. राज्यातील अनेक पोल्ट्री व्यवसायिक आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण अनेक पोल्ट्रीमध्ये हजारो पक्षी उपासमारीने मरण्याची शक्यता आहे. सध्या लॉकडाऊनमुळे पक्षांसाठी आवश्यक असणारे खाद्य विकणाऱ्या कंपन्या बंद असल्यामुळे खाद्य मिळणे अवघड झालं आहे. परिणामी पक्षांची उपासमार होण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे पक्षांना खाद्य नाही तर दुसरीकडे चिकन सेंटर बंद असल्यामुळे पक्षी विकले जात नाहीत. त्यामुळे आता पोल्ट्री व्यवसायिकांनी सरकारकडे पक्षांचे खाद्य मिळण्यासाठी खाद्य बनवणाऱ्या कंपन्यांना माल विकण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.


याबाबत बोलताना पोल्ट्री व्यावसायिक आकाश मांडवे म्हणाले की, आमच्या पोल्ट्रीमध्ये तब्बल सहा हजार पक्षी आहेत. ज्यावेळी कोरोनाची साथ आली त्यावेळी लोकांनामध्ये गैरसमज निर्माण झाला की चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होतो. त्या दिवसापासून पक्षी पोल्ट्रीमध्ये पडून आहेत. अशी परिस्थिती आली होती की, लोकं 30 रुपये किलोने देखील चिकन खरेदी करत नव्हते. त्यामुळे सर्व पक्षी तसेच पोल्ट्रीत होते. त्यानंतर लॉकडाऊनची घोषणा झाली आणि त्यामुळे तर पक्षांसाठी असणारे खाद्य देखील बंद झालं. परिणामी आता पक्षी उपासमारीने मरतात की काय अशी परिस्थिती आहे. याबाबत आम्ही मागे देखील सरकारच्या ही बाब निदर्शनास आणून दिली होती. परंतु अद्याप याबाबत काहीही निर्णय झालेला नाही. आमची मागणी आहे की, सरकारने पक्षांसाठी खाद्य बनवणाऱ्या कंपन्यांना माल विक्रीसाठी परवानगी द्यावी.अन्यथा सर्व पक्षी उपासमारीने मरतील.




पोल्ट्री व्यावसायिक ज्ञानेश्वर फडतरे म्हणाले, आम्ही आमच्या संघटनेच्यावतीने सरकारला आम्हांला मदतीचं आव्हान केलं आहे. परंतु अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. अपेक्षा आहे निदान सरकार खाद्य कंपन्यांना सुरु करण्याची परवानगी देईल. त्यासोबतचं माल पोहचवण्यासाठी चारचाकी गाड्यांना देखील परवानगी द्यावी जेणेकरून आम्हांला पक्षांसाठी खाद्य आणता येईल. त्यामुळे पोल्ट्रीमध्ये असणारे हजारो पक्षी वाचतील. सध्या राज्यात हजारो पोल्ट्री व्यावसायिक आहेत.



संबंधित बातम्या : 





 

Special Report | कोरोनाच्या संकटात ऑन ड्युटी 24 तास असणाऱ्या पोलिसांच्या घरी काय स्थिती? स्पेशल रिपोर्ट