मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर दिल्लीतील निजामुद्दीन मुस्लिम बांधवांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी हजारो जण येथे जमले होते. दरम्यान साऱ्या घडामोडीनंतर निजीमुद्दीनमधील मरकज हे कोरोनाचं हॉटस्पॉट म्हणून देखील घोषित करण्यात आले. देशासह विदेशातील मुस्लिम बांधव देखील या ठिकाणी जमले होते. यानंतर देशातल्या मकरज येथे गेलेल्यांचा देखील शोध घेतला गेला. अनेकांना क्वारंटाईन देखील करून ठेवण्यात आले आहे. यापैकी काही जण हे कोरोनाबाधित झाल्याचं देखील आता समोर आले आहे. या साऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांचा आता शोध घेतला जात आहे. दरम्यान, आता मरकजचं रत्नागिरी कनेक्शन देखील समोर आले आहे. रत्नागिरीतील तिघे जण या ठिकाणी गेले होते. त्यापैकी एकाला मुंबईमध्ये, एकाला आग्रामध्ये आणि एकाला रत्नागिरी जिल्हा सिव्हिल रूग्णालयात क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. या बाबतची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. हा विषय संवेदनशील आणि गंभीर आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील यावेळी त्यांनी केले आहे. रत्नागिरीतील सिव्हिल रूग्णालयात दाखल केलेल्या रूग्णावर सध्या डॉक्टरांचे देखील लक्ष आहे


काय आहे रत्नागिरीतील कोरोनाची स्थिती?
रत्नागिरीतील एक रूग्ण हा 19 मार्च रोजी कोरोनाबाधित आढळून आला होता. दुबईहून आलेल्या 50 वर्षाच्या रूग्णाला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होते. त्यानंतर त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्या पत्नीचे आणि भावाचे रिपोर्ट देखील केले गेले. ते देखील निगेटिव्ह आले. महत्त्वाची बाब म्हणजे रत्नागिरीतील पहिल्या कोरोनाबाधित रूग्णाचे आतापर्यंत केलेले दोन्ही रिपोर्ट हे निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे रत्नागिरीत सध्याच्या घडीला तरी कोरोनाबाधितांची संख्या शून्य झाली आहे. पण, त्यानंतर देखील जिल्हा प्रशासन खबरदार असून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. शिवाय, शेकडो लोकांना होम क्वारंटाईन देखील करून ठेवण्यात आले आहे. मुंबई आणि पुण्याहून आलेल्यांवर देखील आता विशेष लक्ष ठेवले जात आहे.

Nijamuddin Corona | निजामुद्दीनमध्ये हजेरी लावणारे उत्तर प्रदेशमधील 97 जण कोरोना पॉझिटिव्ह

 

गाव जवळ करण्याची धडपड
कोकणी माणूस मोठ्या प्रमाणावर सध्या मुंबई आणि पुण्यामध्ये कामाकरता स्थायिक झाला आहे. पण, लॉकडाऊननंतर तो आता आपल्या गावाकडे निघाला आहे. रस्ते बंद असले तरी समुद्र मार्गे, जंगलाचा आडोसा घेत किंवा अगदी कोकण रेल्वेच्या ट्रकवरून गावी निघाला आहे. यापैकी अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेत तपासणीअंती क्वारंटाईन देखील करून ठेवले आहे.

'प्रेस'चा बोर्ड वापरून मुंबई - रत्नागिरी प्रवास
पत्रकारांना सध्याच्या घडीला काही प्रमाणात मुभा देण्यात आली आहे. ओळखपत्र दाखवल्यानंतर त्यांना सोडले जात आहे. याचाच फायदा घेत आपल्या फोर व्हिलरवर 'प्रेस'चा बोर्ड लावत चार मुली रत्नागिरीत दाखल झाल्या. पण, पोलिसांनी त्यांची ही लबाडी पकडली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेत त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर गु्न्हा देखील नोंदवण्यात आला.

संबंधित बातम्या :