Harikant Bhanushali Passes Away : ज्येष्ठ थोरॅसिक सर्जन आणि कुशल वैद्यकीय तज्ञ डॉ. हरिकांत भानुशाली (Harikant Bhanushali) यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. ते 87 वर्षांचे होते. ठाण्याच्या कौशल्य हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेली अनेक वर्ष रुग्णसेवा सेवा प्रदान करणाऱ्या डॉ. भानुशालींचा त्यांच्या वैद्यक क्षेत्रातल्या कार्याप्रती भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते वैद्यक क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान डॉ. बीसी रॉय पुरस्काराने गौरव केला गेला आहे. थोरॅसिक सर्जरीचे जनक आणि भारतातील थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रियेचे प्रणेते म्हणून त्यांचं वैद्यक क्षेत्रात मोठं योगदान राहिलं आहे. डॉ. भानुशालींचा जन्म मुंबई जवळच्या शहापुरातल्या किन्हवली या छोट्याशा गावात झाला. अत्यंत गरिबीतून आणि कष्टातून शिक्षण पूर्ण करुन त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठं योगदान दिलं. डॉक्टर आणि सर्जन बनण्याची त्यांची आकांक्षा होती. त्यांनी छबिलदास येथे शालेय शिक्षण तर रूपारेल महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नायर रुग्णालयात सुरू ठेवण्यासाठी कारकुनी नोकरीही केली. शस्त्रक्रियेत पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर, त्यांनी ठाणे येथे स्थायिक होण्याचे ठरविले. 


डॉ. भानुशाली यांनी आंतरराष्ट्रीय शल्यविशारद महाविद्यालय संघटनेचे अध्यक्षपदही भूषवले. रुग्णसेवा आणि समाजसेवा करतानाच वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे शिक्षक म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केले. ठाणे आणि मुंबई क्षेत्रातील विविध वरिष्ठ वैद्यकीय पदे त्यांनी भूषवली. आजवर गरीबांसाठी 12 हजारांहून अधिक शस्त्रक्रिया, ठाण्यातील टीबी प्रतिबंधासाठी साडेतीन लाख मुलांचे लसीकरण, रुग्णांसाठी मोफत बेड्सची सुविधा, 20 वर्ष ठाण्याच्या मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद अशी अनेक प्रकारची कार्ये त्यांच्या नावावर नोंदलेली आहेत. रुग्णसेवेसाठी त्यांनी कौशल्या चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलचीही स्थापना केली.


थोरॅसिक सर्जरीचे जनक म्हणून वैद्यक क्षेत्रात मोठं योगदान 


हरिकांत भानुशाली यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते वैद्यक क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान डॉ. बीसी रॉय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी अनेक शिबिरे घेतली. आदिवासी आणि इतर आदिवासींची सेवा केली आणि ते खरे सामाजिक सुधारणावादी होते. त्यांनी माध्यमिक शिक्षणासाठी कळव्यात शाळा काढली आणि अनेक वर्ष मराठी विद्या परिषदेची सेवाही केली. 2002 मध्ये स्टेशन रोड ठाणे येथे स्वतःचे हॉस्पिटल स्थापन केल्यानंतर, त्यांनी कौशल्या चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलची स्थापना केली जे ठाण्यातील 152 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि हे युनिट मोठ्या प्रमाणात लोकांना सेवा देते. त्यांच्या पश्चात शल्यचिकित्सक पुत्र डॉ. अमोल हे एक आघाडीचे थोरॅसिक सर्जन आहेत.


ठाण्यात गेली 35 वर्ष सेवा प्रदान करणारे डॉ. भानुशाली यांनी मुंबईतील नायर हॉस्पिटलमधून एमबीबीएस केल्यानंतर इंग्लंड आणि अमेरिकेतील उच्च पदव्या प्राप्त केल्या. तसेच, पुढे आंतरराष्ट्रीय शल्यविशारद महाविद्यालय संघटनेचे अध्यक्षपदही भूषवले. ते दानशूर म्हणूनही ओळखले जातात. तसेच, एक वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे शिक्षक म्हणूनही त्यांनी अनेक वर्ष काम केले. ठाणे आणि मुंबई क्षेत्रातील विविध वरिष्ठ वैद्यकीय पदे त्यांनी भूषवली. त्याच वेळी तितक्याच प्रमाणात ते सामाजिक क्षेत्रातही कार्यरत राहिले. गरीबांसाठी 12 हजारांहून अधिक शस्त्रक्रिया, ठाण्यातील टीबी प्रतिबंधासाठी साडेतीन लाख मुलांचे लसीकरण, रुग्णांसाठी मोफत बेड्सची सुविधा, 20 वर्ष ठाण्याच्या मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्षपद अशी अनेक प्रकारची कार्ये त्यांच्या नावावर नोंदलेली आहेत. त्यासाठी त्यांना विविध सन्मानही लाभले. त्यांच्या वैद्यक क्षेत्रातील योगदानाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील मानाच्या बी. सी. रॉय पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्तेही सन्मानित करण्यात आलं होतं.


महत्वाच्या बातम्या :