एक्स्प्लोर

नाशिकमध्ये दोन एटीएमवर दरोडे, लाखो रुपये लंपास

नाशिकमध्ये एकच रात्रीत 2 एटीएम फोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बुधवारी रात्री चोरांनी जेलरोडमधीलच एसबीआयचं फोडलं. त्यानंतर काही वेळाने मखमलाबादमधील एसबीआयच्या एटीएमवरही चोरट्यांनी दरोडा टाकला.

नाशिक :नाशिकमध्ये एकच रात्रीत 2 एटीएम फोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बुधवारी रात्री चोरांनी जेलरोडमधील एसबीआयचं फोडलं. त्यानंतर काही वेळाने मखमलाबादमधील एसबीआयच्या एटीएमवरही चोरट्यांनी दरोडा टाकला. जेलरोड येथील एटीएममधील 13 लाख तर मखमलाबादमधील एटीएममधले 31 लाख 75 हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. हे दोन्ही एटीएम गॅस कटरने फोडण्यात आले आहेत. मखमलाबादमधील एटीएममधून बुधवारी कोणताही व्यवहार न झाल्याने बँकेला शंका आली, तेव्हा तिथेही दरोडा पडल्याचे बँकेच्या लक्षात आले. दरम्यान दोन्ही एटीएमच्या बाहेर सुरक्षारक्षक का नव्हता असा सवालही उपस्थित केला जात आहे. बुधवारी पहाटे जेलरोड परिसरातील शिवाजीनगरच्या एटीएममधून 13 लाख 30 हजार रुपये चोरीला गेले होते. सकाळी काही ग्राहक पैसे काढण्यासाठी तिथे गेले असता हा प्रकार समोर आला होता. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळीदेखील मखमलाबाद गावातील एसबीआयचेच एटीएम फोडून चोरांनी तब्बल 31 लाख 45 हजार रुपयांवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. हे एटीएमदेखील बुधवारी पहाटे फोडण्यात आल्याची बाब समोर आली आहे. चोरांनी एटीएमचे शटर बंद करुन ठेवल्याने हा प्रकार उजेडात आला नव्हता. बुधवारी दिवसभर या एटीएममधून कोणताही व्यवहार न झाल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी याबाबत गुरुवारी शहानिशा केली असता हे एटीएमदेखील गॅस कटरच्याच सहाय्याने कापून चोरी झाल्याचे समोर आले आहे. मखमलाबाद परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेरात चोरीची दृश्यं कैद झाली असून त्याआधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. विशेष म्हणजे याही एटीएमबाहेर बँकेकडून सुरक्षारक्षकाही नेमणूक करण्यात आलेली नसल्याने एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
Embed widget