एक्स्प्लोर
Advertisement
...म्हणून मी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत आलो : अमोल कोल्हे
शिवसेनेला सोडचिट्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले मराठी अभिनेते अमोल कोल्हे यांनी त्यांच्या प्रचाराची आज सांगता केली. यावेळी कोल्हे यांनी शिवसेना सोडण्यामागचा गौप्यस्फोट केला.
पुणे : शिवसेनेला सोडचिट्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले मराठी अभिनेते अमोल कोल्हे यांनी त्यांच्या प्रचाराची आज सांगता केली. यावेळी कोल्हे म्हणाले की, शिवसेनेने मला साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढाल का? असे विचारले होते. त्यावेळी मी छत्रपतींच्या गादीशी बेईमानी करणार नाही. असे बजावून शिवसेनेला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती घेतले.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. अमोल कोल्हे हे शिवसेनेचे नेते होते. काही अमोल कोल्हे यांना शिवसेनेने उदयनराजेंविरोधात निवडणूक लढण्यास सांगितले होते. परंतु कोल्हे यांनी त्यास विरोध करत शिवसेनेला रामराम केला. आज अमोल कोल्हे यांनी शिवसेना सोडण्यामागचा गौप्यस्फोट केला.
VIDEO | अमोल कोल्हे यांचं भाषण | पिंपरी चिंचवड | हॅलो माईक टेस्टिंग | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
राजकारण
राजकारण
Advertisement