एक्स्प्लोर

राष्ट्रवादीच्या सभांमध्ये आता दोन झेंडे फडकणार, अजित पवारांची घोषणा

भाजपने महाराष्ट्राला फसवलं आहे. शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. आमचं सरकार आलं तर चार महिन्यात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करु. शब्द पाळला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं.

परभणी : राष्ट्रवादीच्या प्रत्येक सभेत यापुढे पक्षाच्या झेंड्यासह भगवा झेंडा फडकणार आहे. या भगव्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणार आहे, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरीमध्ये राष्ट्रवादीच्या 'शिवस्वराज्य' यात्रेत अजित पवारांनी ही घोषणा केली.

राष्ट्रवादीच्या सभांमध्ये आता पक्षाचा आणि भगवा झेंडा असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज कुणाजी जहागिरी नाही. शिवाजी महाराज कुणाच्या मालकीचे नाहीत, महाराज सगळ्यांचे आहेत. त्यानुसार परभणीत शिवस्वराज्य यात्रेदरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भगवे झेंडे लावण्यात आले होते.

निवडणुका जवळ आल्या म्हणून कारवाई सुरु

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. यावरही अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली. निवडणुका जवळ आल्या की असे आदेश, नोटीस निघतात. मी राज्य सहकारी बँकेचा संचालक होतो, मात्र निर्णय माझे नव्हते. आम्ही कायद्यात राहूनच काम केलं. आम्ही न्यायालयाचा आदर करतो, मात्र गुन्हा दाखल करण्याची गरज नसताना हे झालं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं.

भाजपकडून शेतकऱ्यांची फसवणूक

भाजपने महाराष्ट्राला फसवलं आहे. शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. ती कधी मिळणार याची माहिती नाही. आमचं सरकार आलं तर चार महिन्यात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करु. शब्द पाळला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असं आश्वासन अजित पवारांनी दिलं. साले म्हणणाऱ्यांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असा टोलाही त्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला.

या सरकारच्या कार्यकाळात सामान्य माणसांचं उत्पन्न कमी झालं. मात्र अदानी, अंबानी सारख्या उद्योगपतींचं यांचं उत्पन्न दुपटीने वाढलं, असंही अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

मोहम्मद इरफानसारख्या लाखोंच्या स्वप्नांचा आक्रोश! 
मोहम्मद इरफानसारख्या लाखोंच्या स्वप्नांचा आक्रोश! 
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
Ambernath News :मोठी बातमी! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; आमदार बालाजी किणीकर यांची माहिती

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget