Girish Mahajan : आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात आता कोणतेही वाद नाहीत. परवा त्यांच्यात थोडा शाब्दिक वाद झाला होता. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसून त्यांची समजूत काढतील, असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी केलं. आता कोणीच कोणावर टीका टिप्पणी करत नाही. याबाबत माझे रवी राणा आणि बच्चू कडू या दोघांशीही बोलणं झालं असल्याचे महाजन यावेळी म्हणाले.


आता सध्या दोघेही एकमेकंविरुद्ध बोलत नाहीत. दोघांमध्ये थोडेशे गैरसमज झाले असतील असेही महाजन म्हणाले. त्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, दोघांनांही बोलावून आपापसातले मतभेद मिटवले जातील असेही महाजन यावेळी म्हणाले. काल किंवा आज दोघेही याबाबत काही बोलले नाहीत. त्यामुळं सध्या बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात कोणतेही मतभेद राहिले नसल्याचे महाजन यांनी सांगितलं. मंत्रीमंडळ विस्ताराचा आणि या शाब्दिक वादाचा काही संबंध असल्याचे मला वाटत नाही, असे ते म्हणाले.


एकनाथ खडसेंच्या बाबतीत जे सत्य आहे ते बाहेर येईल


एकनाथ खडसे यांना नेमकं असं का वाटत आहे की त्यांना जेलमध्ये टाकलं जणार आहे. जे सत्य आहे ते बाहेर येऊद्यात असे वक्तव्य गिरीष महाजन यांनी यावेळी म्हणाले. तुम्हीच एवढा गोंधळ कशाला करता असेही ते म्हणाले. तसेच तुमची बाजू कोर्टात मांडा, ACB मध्ये मांडा असे महाजन म्हणाले. निर्णय येण्याच्या आधी आपण गोंधळ करु नका. जे सत्य आहे ते बाहेर येईल. त्यांना चाहूल लागली आहे  की काय आत जाण्याची असा टोलाही महाजनांनी खडसेंवर लगावला.


आदित्य ठाकरेंनी अडीच वर्षापूर्वी दौरे केले असत तर शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती 


युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत, याबद्दल देखील महाजन यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, अडीच वर्षात आदित्य ठाकरे यांनी कधी दौरा केला नाही, शेतकऱ्यांच्या बांधावर सुद्धा कधी गेले नसल्याची टीका महाजन यांनी ठाकरेंवर केली. आदित्य ठाकरेंनी पहिलेच हे दौरे केले असते तर शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती असे महाजन यांनी सांगितलं. दरम्यान सरकार सर्वोतपरी मदत करत असल्याचे महाजन म्हणाले. मागच्या अडीच वर्षाच्या काळात आदित्य ठाकरे बांधावर गेले नाहीत, बंधाऱ्यावर गेले नाहीत. पण आज आम्हाला आनंद वाटतो की त्यांना ओला दुष्काळ काय ते कळायला लागलं, तसेच बंधारा काय ते कळत आहे असा टोला महाजन यांनी लगावला. हेच लक्ष जर अडीच वर्षापूर्वी त्यांनी शेतकऱ्यांकडे दिलं असतं तर शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती असे महाजन यांनी सांगितलं.


महत्त्वाच्या बातम्या:


Bacchu Kadu : रवी राणांबाबत ठोस भूमिका घ्या अन्यथा मोठा धमाका करु; बच्चू कडूंचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा