धुळे : धुळे जिल्ह्यात पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा कुणीही घेत नसल्यानं चोरट्यांनी किराणा दुकान लुटलं आहे. या लुटीत 17 हजारांच्या सुट्ट्या पैशांसह पंधरा किलोचा तेलाचा डबाही पळवला आहे.
धुळ्याच्या बेटावद गावात ही चोरीची घटना झाली आहे. चोरट्यांनी पाचशे आणि हजाराच्या नोटा चालत नसल्यानं तब्बल 17 हजारांचे सुट्टे पैसे चोरले आहेत. यात पाच, दहा आणि शंभराच्या नोटांचा समावेश आहे. तसंच चोरट्यांनी दोन हजारांची एक नोटही लांबवली आहे.
नोटाबंदीच्या घोषणेनंतर चोरट्यांनी ठिकठिकाणी सुट्टे पैसे चोरायला सुरुवात केली आहे. दरम्यान या चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.