कोल्हापूर : कोल्हापुरातील वडगाव-अष्टा मार्गावर पोलिसांनी एक कोटींची रोकड जप्त केली आहे. ही रक्कम हुतात्मा सहकारी बँकेची असल्याची माहिती आहे.
कोल्हापूर पोलिसांच्या नाकाबंदी पथकाने बोलेरो गाडीतून नेली जाणारी रक्कम पकडली आहे. वडगाव शहराच्या हद्दीमध्ये पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये पाचशे आणि 1 हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.
या घटनेची माहिती पोलिसांनी आयकर विभागाला कळवली असून गाडी चालकासह तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. ही रक्कम नेमकी कशासाठी वापरण्यात येणार होती आणि ती कुणाची आहे याचा पोलिस अधिकारी आणि आयकर अधिकारी शोध घेत आहेत.