एक्स्प्लोर

'अजित पवार मराठा मोर्चात का नाहीत?'

नागपूर : नागपूरमध्ये मराठा मोर्चासाठी सर्वपक्षीयांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे बहुसंख्य मंत्री, आमदार मोर्चात सहभागी होत आहेत. तर विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदारही मोर्चात सहभागी होणार आहेत. मात्र या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार दिसले नाहीत. त्याबाबत माजी मंत्री जयंत पाटील यांना विचारलं असता, त्यांनी "अजित पवार आज बारामतीत निवडणूक असल्याने त्याठिकाणी व्यस्त आहेत, म्हणून मराठा मोर्चात सहभागी होऊ शकणार नाहीत", असं सांगितलं. जयंत पाटील म्हणाले, "विधानसभेचं कामकाज सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या आमदारांना मराठा मोर्चात सहभागी व्ह्यायचं आहे ते होतील. अजित पवार आज बारामतीत निवडणूक असल्याने त्याठिकाणी व्यस्त आहेत, म्हणून मराठा मोर्चात सहभागी होऊ शकणार नाहीत". मराठा मोर्चाचा स्थानिक निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसला म्हणून तुम्ही मोर्चापासून दूर आहात का? असा प्रश्नही जयंत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले, "इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीतमध्ये कुठल्याही सामाजिक समीकरणाचा मला फटका बसलेला नाही. सर्व समाज माझ्या पाठीशी आहे". राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते दरम्यान काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मराठा मोर्चात सहभागी होणार असल्याचं सांगितलं. काँग्रेसचे सर्व आमदार मोर्चात सहभागी होतील. यावेळी विखे पाटील यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. "शिवसेनेचे आमदार भगवे फेटे घालून सभागृहात आले. शिवसेनेने हा मोर्चा साजरा करण्याचं कारण नाही. हे सत्तेत असून विरोध करतात. हे इव्हेंट मॅनेजमेंटचे सरकार आहे", अशी टीका विखेंनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात, राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
Embed widget