एक्स्प्लोर

पडद्यामागचं अधिवेशन, दिवस दुसरा

विधानसभेच्या अधिवेशनातील आंदोलनं, घोषणाबाजी, विधेयकं,प्रस्ताव या गोष्टी तुम्ही ऐकतंच असाल पण याही पलीकडे खुप काही गोष्टी घडत असतात. यामध्ये आमदार, नेत्यांचे पडद्यामागचे अनेक किस्से आहेत जे खुप गंमतीशीर आहेत.

मुंबई: अधिवेशनात आंदोलनं, घोषणाबाजी, विधेयकं,प्रस्ताव या गोष्टी तुम्ही ऐकतंच असाल पण याही पलीकडे खुप काही गोष्टी घडत असतात.  यामध्ये आमदार, नेत्यांचे पडद्यामागचे अनेक किस्से आहेत जे खुप गंमतीशीर आहेत.
कडक ड्रेसिंगची, कडक चर्चा 
देवानंद कॅप, ब्लॅक टी शर्ट आणि ब्राऊन जॅकेट घालून अनिल देशमुखांनी अशी काय एन्ट्री घेतली की सगळेच चकित झाले. कारण नेहमीच गांधी टोपी घालून वावरणारे देशमुख आज एकदम हिरोच्या लूकमध्ये आले होते त्यामुळे आज चर्चा देशमुखांच्या कडक ड्रेसिंगची होती. काल अजित पवारांनी चहापानाला सूटबूटमध्ये एन्ट्री केली होती.  पण आज दादांचा लूक बदलले होता. अजित पवार आज सफारीत आले होते तर अबु आझमी आणि प्रकाश सुर्वे यांनी सुद्धा सूट परिधान केला होता नेहमीच सफेद कपड्यांवर दिसणा-या नेत्यांना आज वेगळ्या लूक मध्ये पाहिल्यानंतर चर्चा तर रंगणारच.
मंत्रीपदावरून आमदारांमध्ये चिडवाचिडवी  
“मंत्री आला बघा”, मंत्रीपदाच्या यादीत याचं नाव पक्कं, कुठलं मंत्रीपद घेणार इथेपर्यत आज महाविकास आधाडीच्या आमदारांमध्ये चर्चा रंगली. मंत्रिमंडळ विस्तार जवळ आला आहे. जुन्या आणि नविन आमदारांना मंत्रीपद मिळेल अशी आशा आहे. मंत्री होण्याच्या काही आमदारांच्या इच्छा चेह-यावरच दिसत असतात तर काही गुपचुप गुपचुप लाॅबिंग करत असतात पण अशीच सगळी मंडळी एकत्र आली की फार मजा येते आज अशीच महत्वाकांशी मंडळी एकत्र आली आणि एकमेकांना चिडवताना दिसली.
भाजपच्या आंदोलनाची शिवसेनेनं घेतली मजा 
“बोंबलायचं तेवढं आता पाच वर्ष बोंबला” असं म्हणत शिवसेनेच्या काही आमदारांनी भाजपच्या आंदोलनाची मजा घेतली. ज्याठिकणी भाजपचं आंदोलन सुरु होतं त्याच्या विरुद्ध दिशेला शिवसेनेचे काही आमदार एकत्र जमले होते. पाच वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर भाजपनं नागपूर अधिवेशनाचा पहिला दिवस आंदोलनानं गाजवला. सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजपनं राहुल गांधी, उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी केली त्याचवेळी भाजपवाल्यांचे घसे बसले की गप्प बसतील अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या आमदारांमध्ये होती त्यामुळे एकीकडे भाजप आंदोलनात व्यस्त असताना दुसरीकडे  कोप-यात उभे राहुन सेनेचे आमदार मजा घेत होते.
दरेकरांना लाॅटरी कशी लागली? 
विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी प्रविण दरेकरांना संधी मिळताच अनेकांना भुवया उंचावल्या कारण अखेरपर्यंत सुजितसिंग ठाकूर याचं नाव चर्चेत होतं. जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं कळत होतं असं असताना हि लाॅटरी दरेकरांना कशी लागली हा प्रश्न भाजपसह महाविकास आघाडींच्या नेत्यांना पडला आहे. दरेकर विरोधी पक्षनेते विराजमान झाल्यानंतर प्रकाश सुर्वे देखील चिंतेत दिसले कारण दरेकर आणि प्रकाश सुर्वे यांच्यातलं द्वंद सर्वांनाच माहित आहे. दोघेही एकाच मतदारसंघातले असल्यामुळे पुढे नाट्यमय घडामोडी घडताना दिसतील
संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
ऑक्टोबर हीट चा तडाका अधिक, नेमकी का होतेय तापमानात वाढ? राज्यात पावसाची शक्यता आहे का? हवामानाचा अंदाज काय?
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget