कोल्हापूर : दी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. ऑनलाईनद्वारे बँकेचे 67 लाख 88 हजार रुपये लुटलण्यात आलं आहे. दी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे, एचडीएफसी बँकेत असलेल्या खात्यातून ही रक्कम लुटली आहे.
ही घटना शुक्रवारी (19 एप्रिल) सकाळी अकरा ते दुपारी अडीचच्या सुमारास घडली. चोरट्याने ही रक्कम वेगवेगळ्या 34 खात्यांवर ट्रान्सफर केले आहेत. आरटीजीएस आणि एनईएफटी या ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करुन, संशयिताने अर्बन बँकेला गंडा घातला.
'दी कोल्हापूर अर्बन'चे मुख्य कार्यकारी अधिकारी बाजीराव खरोशी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शाहूपुरी पोलिसांनी रात्री उशिरा अज्ञाताविरुद्ध अपहार, फसवणूक, माहिती, तंत्रज्ञान अधिनियम 2008 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर पोलीस मुंबई सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.
कोल्हापूर अर्बन बँकेला ऑनलाईन गंडा, लाखो रुपये 34 खात्यांवर ट्रान्सफर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Apr 2019 07:50 AM (IST)
या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर पोलीस मुंबई सायबर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -