रत्नागिरी : फ्रांसच्या (France) सहकार्याने होत असलेला जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प (Jaitapur project) हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा निर्मिती प्रकल्प असून या प्रकल्पामुळे भारतीय आणि फ्रेंच उद्योगांमधील (India France) सहकार्य अधिक वाढेल, असे प्रतिपादन फ्रांसचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शॉर्ले यांनी केले आहे. शॉर्ले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सोमवारी (20 डिसेंबर) राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.


फ्रांस 2022 साली भारतात आपला सांस्कृतिक महोत्सव 'बॉनजो इंडिया' (Bonjour India) आयोजित करणार आहे. या महोत्सवानंतर भारत देखील फ्रांस मध्ये 'नमस्ते फ्रांस'  (Namaste France) या भारताच्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करणार आहे. या दोन्ही महोत्सवांबद्दल यावेळी माहिती देण्यात आली. शॉर्ले यांनी याबाबत सांगितले. दरम्यान कोरोना काळात भारतातील फ्रेंच कंपन्यांनी एकही कामगार कपात केली नाही असे वाणिज्यदूतांनी राज्यपालांना सांगितले. राफेल विमानाच्या करारावेळी भारत-फ्रांस संबंध अधिक मजबूत झाले असून फ्रेंच कंपनी दासाऊँ एव्हिएशनच्या सहकार्याने नागपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे कार्यही सुरु असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. राज्यातील 22 सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती या नात्याने फ्रांसमधील विद्यापीठांनी राज्यातील विद्यापीठांशी सहकार्य करण्यास प्रस्ताव केल्यास आपण त्याचे स्वागत करू असेही राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी वाणिज्यदूत शॉर्ले यांनी सांगितले. 


संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha