एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्याची आर्थिक स्थिती बिकट, कर्जाची सर्वोच्च मर्यादा गाठली
राज्यावर 2 लाख 69 हजार 355 कोटींच कर्ज होतं. ही रक्कम आता 2017- 18 मध्ये ते 4 लाख 13 हजार 44 कोटी झाली आहे.
मुंबई : राज्याची आर्थिक स्थिती पूर्णतः कोलमडण्याच्या स्थितीत आल्याची परिस्थिती आहे. भाजप सरकार सत्तेत आलं तेव्हा राज्यावर 2 लाख 69 हजार 355 कोटींच कर्ज होतं. ही रक्कम आता 2017- 18 मध्ये ते 4 लाख 13 हजार 44 कोटी झाली आहे. शिवाय कर्ज घेण्याची सर्वोच्च पातळी राज्याने गाठली असल्याचं खुद्द राज्य सरकारच्या वित्त विभागानेच म्हटलं आहे.
राज्याची परिस्थिती काय आहे?
- वर्ष 2013-14 मध्ये राज्यातील कर्ज 2 लाख 69 हजार 355 कोटी
- आजच्या घडीला राज्यावर 4 लाख 13 हजार 44 कोटींचं कर्ज
- राज्यातील एका नागरिकावर 39 हजार 508 रुपये कर्जाचा भार
- वर्ष 2016-17 मध्ये कर्ज 3 लाख 56 हजार 216 कोटी असून व्याजाच्या परतफेडीसाठी 28 हजार 220 कोटी द्यावे लागणार
- वर्ष 2015- 16 मध्ये कर आणि कराच्या महसूलातून जमा होणाऱ्या 75 हजार 874 कोटी 89 लाखांच्या महसूलावर राज्य सरकारने पाणी सोडलं
- गेल्या तीन वर्षात महसूल वाढण्यासाठी ठोस प्रयत्न नाहीत, असं निरीक्षण समर्थन या संस्थेने राज्याच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना नोंदवलं आहे.
- नंदुरबार – 66 हजार 110 रुपये
- वाशिम- 66 हजार 462 रुपये
- हिंगोली- 66 हजार 998 रुपये
- पुणे- 2 लाख 4 हजार 60 रुपये
- ठाणे - 2 लाख 17 हजार 94 रुपये
- मुंबई- 2 लाख 58 हजार 749 रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
निवडणूक
राजकारण
Advertisement