मुंबई : भारत कोरोनाव्हायरस महामारीच्या दुसऱ्याचं टप्प्यात आहे. देशभरातील लॉकडाऊन, डॉक्टरांचे प्रयत्न आणि जनतेचं सहकार्य यामुळे अजूनही आपण कोरोनाव्हायरस साथीच्या दुसऱ्याच टप्प्यात आहोत, असं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटल आहे.


देशभरात सध्या साडेपाच लाखांपेक्षा जास्त कोरोना टेस्ट झाल्या आहेत. त्यामधून पॉझिटिव्ह केसेस सापडण्याचं प्रमाण फक्त 4 टक्क्यांचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यापुढे त्यांनी भारत अजून तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच कम्युनिटी ट्रान्समिशनच्या फेजमध्ये दाखल झालेला नाही, ही समाधानाची बाब असल्याचंही ते म्हणाले.


कोरोनाव्हायरस चाचण्या करण्यासाठी आयात केलेल्या सदोष किट संबंधित देशाला परत पाठवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या किटसाठी भारत सरकारने अजून पैसेच दिले नसल्याचंही ते म्हणाले.


कोरोनाबाधित रुग्ण डबल होण्याचा वेग सध्या दहा दिवसांवर पोहोचला असून हे खूप सकारात्मक पाऊल असल्याचं हर्षवर्धन म्हणाले. आपण देशातल्या प्रत्येक हॉटस्पॉट आणि क्लस्टरवर बारकाईने लक्ष्य ठेवून आहोत. मार्च महिन्यात कोरोना हा दर जवळपास तीन दिवसांचा होता. आपला कोरोनाबाधितांचा मृत्यू दरही तीन टक्क्यांच्या जवळपास असून बऱ्यापैकी नियंत्रणात असल्याचं ते म्हणाले. तसंच दर दहा लाख लोकसंख्येमागे भारताचं कोरोनाबाधिताचं प्रमाणही तुलनेनं कमी असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला आधीचा तीन आठवड्यांचा लॉकडाऊन आणि नंतर वाढवलेला 3 मे पर्यंतचा लॉकडाऊन याचा कोरोना विषाणू पसरवू नये यासाठी खूपच फायदा झाल्याचा दावाही त्यांनी केला.


संबंधित बातम्या :

Plasma therapy | पूल टेस्टिंग व प्लाज्मा थेरपीला केंद्राची मान्यता; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती


Plasma Therapy | प्लाझ्मा थेरपी सकारात्मक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा दावा



 Corona Mumbai | वाढदिनी आई कर्तव्यावर, मुलाचा आरोग्य कर्मचारी असलेल्या आईला संदेश, व्हिडीओ व्हायरल