नवी दिल्ली : कोविड 19 च्या प्रादुर्भावावर सुरु असलेल्या वेगवेगळ्या उपचारांपैकी एक असलेल्या प्लाझ्मा थेरपी पुन्हा चर्चेत आलीय. आज राजधानी नवी दिल्लीत सुरु असलेल्या चार रुग्णांवरील चाचणीचे निष्कर्ष खूपच सकारात्मक असल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

प्लाझ्मा थेरपीच्या या मनोबल वाढवणाऱ्या निष्कर्षानंतर आणखी काही चाचण्या केल्या जाणार आहेत, त्याचे निष्कर्ष कसे येतात, ते पाहून आम्ही लवकरच केंद्राकडे मोठ्या प्रमाणावर प्लाझ्मा थेरपी अंमलात आणण्यासाठी परवानगी मागणार असल्याचंही केजरीवाल यांनी सांगितलं.

दिल्लीतल्या लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीनुसार उपचार केले जात आहेत. या उपचारपद्धतीचे निष्कर्ष खूपच चांगले असल्याचं सांगून केजरीवाल यांनी या चारपैकी दोघांना लवकरच घरी सोडणार असल्याचंही सांगितलं.

हे ही वाचा - BLOG | प्लाझ्मा थेरपीची बाराखडी

प्लाझ्मा थेरपीमध्ये एखाद्या विषाणुजन्य आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरात काही अॅंटीबॉडी तयार होतात. या अँटीबॉडींनी त्या विषाणुंवर विजय मिळवलेला असतो. त्याच अँटीबॉडीचा वापर दुसऱ्या विषाणुबाधित रुग्णाच्या उपचारात केला जातो. यालाच प्लाझ्मा थेरपी म्हणतात.

दिल्लीतल्या तज्ञ डॉक्टरांच्या मते प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना व्हायरसबाधित किमान दहा रुग्ण जरी बरे झाले तरी मोठा परिणाम साधला जाणार आहे.

Plasma treatment | सकारात्मक बातमी! भारतात कोरोनावर प्लाझ्मा उपचार पद्धतीचा वापर होणार


यासाठी जे कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत, त्यांनी रक्तदान तसंच प्लाझ्मा दान करायला हवं. यामुळे नव्या कोरोनाबाधितांवर उपचार करणं सहज शक्य होणार आहे.

 Plazma Therapy For Corona | कोरोनावर प्लाझ्मा उपचार पद्धती


सध्या प्लाझ्मा उपचार विविध देशांमध्ये केले जात आहे. त्याअंतर्गत कोविड -19 मधून बरे झालेल्या रुग्णांचे रक्त या साथीच्या विरूद्ध प्रतिपिंडे असलेल्या प्लाझ्मा रूग्णांना देण्यात येईल. मानवी शरीराच्या प्रतिकारशक्तीखाली तयार केलेले प्रतिपिंडे एक नैसर्गिक औषध आहे. जे कोणत्याही संसर्गाविरूद्ध प्रभावीपणे प्रतिबंध करते. शरीरातील कोणत्याही विषाणूविरूद्ध किंवा बाह्य संसर्गाविरूद्ध प्रतिपिंडे त्यांना पेशींमध्ये सामील होण्यापासून रोखतात. एखाद्या सेलशी संलग्न झाल्यानंतरच व्हायरस गुणाकार होतो. म्हणूनच हे थांबविण्याचा हा एक नैसर्गिक आणि प्रभावी मार्ग आहे. या पद्धतीमुळे व्हायरस नष्ट होतो. कोरोना विषाणूमुळे पसरलेला कोविड -19 साथीचा रोग हा देखील एसएआरएसचा एक प्रकार आहे. अशा परिस्थितीत असे मानले जाते की सार्स प्रमाणेच, या आजाराने बरे झालेले लोकांच्या शरिरात सुमारे एक वर्षासाठी प्रतिपिंडे असतात. त्यांना पुन्हा संसर्गाची प्रकरणे फारच कमी आहेत.