Shashikant Shinde on Devendra Fadnavis: विधानभवनात रमी खेळत नव्हतो असा दावा करत आहेत. जर ते जाहिरात स्किप करत होते तर मग त्यांनी माफी का मागितली? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे. सरकार चालवायच आहे परंतु मुख्यमंत्री हतबल झाले आहेत. जर हे चित्र असेल तर मंत्र्यांना तुम्ही काही करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचा हल्लाबोल शशिकांत शिंदे यांनी केली.
तर मंत्र्यांना भीती राहणार नाही
शशिकांत शिंदे म्हणाले की, अजित पवार यांनी केवळ एकदाच त्यांना दम दिलेला नाही. यापूर्वी देखील दम दिला आहे. मात्र, कोकाटे ऐकत नाहीत. अनेक मंत्र्यांच्या बाबत आरोप आहेत मात्र हे काहीच करत नाहीत. आरोप होऊन सुद्धा निर्णय घेत नसतील तर मंत्र्यांना भीती राहणार नाही. लवकरच महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून आम्ही आंदोलन प्लॅन करत आहोत.
त्यामुळे राष्ट्रवादी मंत्री राजीनामा नाही
शिंदे यांनी पुढे सांगितले की, शिंदेंच्या मंत्र्यांचा राजीनामा होत नसल्याने राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा राजीनामा झालेला नाही. कोकाटे यांना मदत पुनर्वसन देऊन त्यांच पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, आम्ही त्यांचा राजीनामा झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला.
सरळसरळ सरकारच्या पैशांवर डल्ला मारला
लाडकी बहीण योजनेवर बोलताना शिंदे म्हणाले की, विधानसभा अधिवेशनात आम्ही पैसे वाटप झाली त्यांची वसुली करणार नाही, अशी माहिती देण्यात आली. हा सरळसरळ सरकारच्या पैशानावर यांनी डल्ला मारला आहे. चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले आहेत, त्यांच्याकडून वसूल करा. निवडणूक काळात तुम्हाला यांची मतं हवी होती म्हणून कारवाई केली नाही, आता तुम्ही कारवाई करत असल्याची टीका शशिकांत शिंदे यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या