एक्स्प्लोर
जादूटोणा विरोधी कायद्याचा गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हासाठी असलेल्या गोंडवाना विद्यापीठाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. चंद्रपूर-गडचिरोली या मागास जिल्ह्यात अंधश्रद्धा आणि जादूटोणा यांचा पगडा असलेल्या भागात विज्ञानवादी दृष्टिकोन रुजविण्याची रुजुवात केली आहे.
चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाने ऐतिहासिक निर्णय घेतला असून जादूटोणा विरोधी कायद्याचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. विधी शास्त्र आणि समाजशास्त्र अभ्यासक्रमात जादूटोणा विरोधी कायद्याचा अभ्यासक्रम समावेशित केला जाणार आहे. विद्यापीठाच्या अधिसभेत (सिनेट) हा निर्णय झाला असून हा निर्णय घेणारे गोंडवाना विद्यापीठ राज्यातील पहिलं विद्यापीठ ठरले आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हासाठी असलेल्या गोंडवाना विद्यापीठाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. चंद्रपूर-गडचिरोली या मागास जिल्ह्यात अंधश्रद्धा आणि जादूटोणा यांचा पगडा असलेल्या भागात विज्ञानवादी दृष्टिकोन रुजविण्याची रुजुवात केली आहे. आपल्या विद्यार्थ्यांना हे विद्यापीठ जादूटोणा आणि अंधश्रद्धा विरोधी कायदा अभ्यासण्याची संधी देणार आहे. अधिसभेने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांसाठी 10 वर्षांपूर्वी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना केली गेली. हे दोन्ही जिल्हे मागास आणि आदिवासीबहुल आहेत. याशिवाय जिल्ह्यात अंधश्रद्धा आणि जादूटोण्याचे प्रकार उजेडात येत असतात. आता विद्यार्थी स्तरावर यावर अंकुश बसावा आणि एक विज्ञानवादी पिढी निर्माण व्हावी यासाठी विद्यापीठाने राज्याने संमत केलेला 'जादूटोणा विरोधी कायदा' अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
विधी शास्त्र आणि समाजशास्त्र अभ्यासक्रमात या कायद्याचा समावेश होणार आहे. नुकत्याच झालेल्या विद्यापीठाच्या अधिसभेत (सिनेट) या प्रस्तावावर अनुकूल निर्णय झाला. हा कायदा अभ्यासक्रमात समाविष्ट करणारे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातील पहिलं विद्यापीठ ठरले आहे. चंद्रपूर -गडचिरोली जिल्ह्यात जादूटोणा आणि अंधश्रद्धा यांचा समाजमनावर असलेला पगडा बघता या निर्णयाला मोठं महत्व प्राप्त झाले आहे. अत्यंत परिश्रम करून क्लिष्ट प्रक्रियेतून राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आला आहे. त्याचा एकूण समाजाच्या दृष्टीने उपयोग व्हावा यासाठी हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement