नाशिक : कायद्यानूसार सिगारेट पिण्याचे वय आता अठरा वरून एकवीस वर्ष करण्याचा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाने सरकारकडे दिला आहे. तसेच सुट्टी सिगारेट विक्रीवरही बंदी घालण्यात येणार आहे. दरम्यान या निर्णयाच स्वागत जरी करण्यात येत असल तरी याची अंमलबजावणी कशाप्रकारे होणार हा प्रश्नच आहे.


'सिगारेट आरोग्यास हानिकारक आहे' खर तर असा फलक आपल्याला पान टपरी वरच बघायला मिळतो. मात्र याच पानटपरी बाहेर तरुणवर्ग धुराचे झुरके मारतांना सर्रासपणे नजरेस पडतात. विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिण्यास तसेच तंबाखू आणि इतर नशा करण्यास बंदी असतांनाही कॉलेजेस बाहेर किंवा चहाच्या ठेल्यावर ठिकठिकाणी सिगारेटचा धुर सोडणारे, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारत टवाळक्या करणारे दिसून येतात


विशेष म्हणजे सिगारेटच व्यसन करण्यात अल्पवयीन मुलांचाही मोठा समावेश असल्याच दिसून येताच आरोग्य विभागाने एक प्रस्ताव सरकारकडे सादर केलाय. कायद्यानूसार सिगारेट पिण्यासाठी 18 वर्षाची वयोमर्यादा आता 21 वर्ष करण्यात येणार आहे. तसेच तंबाखूजन्य असे कुठलेही पदार्थ 21 वर्षाखालील कोणालाच आणि कुठल्याही मार्गे पोहोचणार नाही यासोबतच सुट्टी सिगारेट विक्रीवरही बंदी घालण्याची शिफारस केली गेली आहे. एवढंच नाही तर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास होणारी कारवाई अधिक कठोर केली जाणार आहे. मुळात सिगारेट असो किंवा तंबाखू हे आरोग्यास हानिकारक आहेत. धक्कदायक म्हणजे जो व्यक्ती सिगारेटचे व्यसन करतो अशा व्यक्तीला कोरोना झाल्यास तो बरा होण्यासही वेळ लागत असल्याचं डॉकटर सांगतात.


विशेष म्हणजे हॉटेल्स किंवा एअरपोर्ट्सवरील धूम्रपान कक्षही बंद करण्यात यावे असं आरोग्य मंत्रालयाच्या प्रस्तावात म्हंटलय. मात्र आजपर्यंत गुटखा बंदी असो किंवा इतर असे अनेक प्रस्ताव सादर केले जातात. त्यावर आदेशही निघतो मात्र त्याच पालन होत नाही त्यामुळे आता या निर्णयाची देखील अंमलबजावी कशी होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.


एकंदरीतच काय तर आरोग्य मंत्रालयाने उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. हा प्रस्ताव मान्य होईल अशी दाट शक्यता जरी असली तरी मात्र तो फक्त कागदावरच न राहता त्याची अंमलबजावली होणे गरजेचे आहे.


संबंधित बातम्या :