एक्स्प्लोर

ठाणे विधानपरिषदेवर युतीचा झेंडा, सेनेचे रवींद्र फाटक विजयी

ठाणे :  ठाणे विधानपरिषद निवडणुकीतील राष्ट्रवादीची सद्दी शिवसेनेने संपवली आहे. कारण शिवसेना - भाजप युतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांचा पराभव केला आहे.   एकूण 1057 मतांपैकी विजय रवींद्र फाटक यांना 601 मतं मिळाली, तर डावखरेंच्या खात्यात 450 मतं जमा झाली. त्यामुळे रवींद्र फाटकांनी 151 मतांनी विजय मिळवत भगवा फडकवला. 6 मतं बाद ठरली.   वसंत डावखरे हे गेल्या तीन टर्म या मतदार संघांतून निवडून येत होते. मात्र यंदा त्यांना गड राखण्यात अपयश आलं.   ठाणे विधानपरिषद निवडणूक : र500 मतांच्या पहिल्या फेरीत- डावखरे 189, रवींद्र फाटक 311 (अंतिम निकाल येणं बाकी)   राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंसमोर यंदा शिवसेना-भाजपने रवींद्र फाटकांना रिंगणात उतरवलं होतं. संख्याबळानुसार शिवसेना-भाजपकडे सर्वाधिक मतं असली तरीही दोन्ही उमेदवारांचं भवितव्य हे अपक्षांच्या 72 मतांवर अवलंबून होतं. त्यातच हितेंद्र ठाकूरांनी आपल्या बहुजन विकास आघाडीची मतं डावखरेंच्या पारड्यात टाकल्याने रवींद्र फाटकांसमोर आव्हान वाढताना दिसतं होतं.   ठाणे महापालिकेतील सर्वच मतदारांनी हक्क बजावला तर कल्याणमध्येही 100 टक्के मतदान झालं.  ठाणे विधानपरिषदेठी 99.72 % मतदान झालं आहे. एकूण 1060 मतदारांपैकी 1057 मतदारांनी मतदान केलं. त्यापैकी 519 पुरुष मतदारांनी तर 538 महिला मतदारांनी मतदान केलं आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 13 मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडलं.  

 एकदा शब्द दिला म्हणजे दिला, आमची सर्व मतं डावखरेंनाच : हितेंद्र ठाकूर

राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंना शिवसेनेच्या रवींद्र फाटकांनी आव्हान दिल्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. भाजपने रवींद्र फाटक यांना पाठिंबा दिला आहे. तर वसंत डावखरेंना काँग्रेससह हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा आहे.   हितेंद्र ठाकूर यांचा डावखरेंंना पाठिंबा, सेना-भाजपची धावाधाव   मतदान केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. तसंच दगाफटका टाळण्यासाठी दोन्ही पक्षातले नेते आपापल्या नगरसेवकांची विशेष काळजी घेताना दिसत होते.

विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून रवींद्र फाटकांना उमेदवारी

महत्त्वाच्या बातम्या

Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Shalarath ID Fraud Nashik : शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक

Embed widget