एक्स्प्लोर
बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम खरेदी, मोठी टोळी जेरबंद
ठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे वेगवेगळ्या कंपन्यांचे सिम कार्ड विक्री करणाऱ्या 7 जणांच्या टोळीला भिवंडी गुन्हे शाखेने अटक केली आहे. या टोळीकडून एकूण 11 हजार 345 वेगवेगळ्या कंपनीचे सक्रिय केलेले, तर बंद असलेले 3 हजार 660 सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत.
फेसबुकच्या माध्यमातून फोटो मिळवून बनावट कागदपत्रांद्वारे सिम कार्ड मिळवत असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. बनावट आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्राच्या छायांकीत प्रतीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी बोगस मतदानासाठी बनावट ओळखपत्र वापरणार होते का, याचा तपास सध्या ठाणे पोलीस करत आहेत. शिवाय दहशतवादी कारवाई किंवा इतर गुन्ह्यांसाठी या कार्डचा भविष्यात उपयोग होणार होता का, याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement