ठाणे : दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाच्या आकड्यात कमालीची वाढ होताना दिसत असून राज्य सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. त्यात पुढच्या विकेंड पासून राज्यात प्रत्येक विकेंड लॉकडाऊन मध्ये जाणार आहे. असे असताना रविवारच्या संध्याकाळी मात्र ठाणेकरांनी सुट्टीच्या दिवशी बाजारपेठत खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती. अक्षरशः कोरोनाचे नियम पायदळी तुडवत नागरिकांनी बाजारपेठत "फुल्लटू" गर्दी केली असल्याचे निदर्शनास आले आहे. ठाणे महापालिका हद्दीत दिवसाला सरासरी हजारो कोरोना रुग्ण आढळून येत आहे, तर दुसरीकडे ठाणेकर नागरिक कोरोना विषाणूच घरी घेऊन घेऊन जात आहेत, असे चित्र दिसून आले.


रविवारी संध्याकाळी ठाणे स्टेशन रोड मार्केट मध्ये प्रचंड गर्दी बघायला मिळाली. तसेच रविवारच्या दिवशी भाजी मंडई मध्ये देखील तूफान गर्दी झाली होती. लॉकडाऊनच्या भीतीने असेल किंवा नेहमीची सवय असेल, पण ठाणेकर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. हे चित्र बद्दलण्यासाठीच महाराष्ट्र सरकारने विकेंडवर लॉकडाऊन लावले आहे. याआधी लागू करण्यात आलेले नियम नागरिकांकडून पाळले जात नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत असल्यानेच राज्य सरकारला कडक निर्बंध घालावे लागले आहेत. 


ठाणे महापालिका क्षेत्रात रविवारी 1701 नवीन रुग्ण सापडले असले तरी नागरिकांमध्ये त्याची भीती नव्हती. कारोनाचे रुग्ण वाढत असूनही मार्केटमध्ये अनेकजण मास्क वापरात नाहीत, सुरक्षित अंतर ठेवत नाहीत असे चित्र आहे. भाजी मंडईमध्ये भाजी विक्रेते दाटी वाटीने बसलेले आहेत दिसत आहेत.


इतकी गर्दी असूनही पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन कुठेही दिसून आले नाहीत. नागरिकांना, दुकानदारांना, भाजी विक्रेत्यांना आवर घालण्यासाठी दोन्ही प्रशासनाचा एकही कर्मचारी त्या परिसरात दिसला नाही. मग कारवाई नक्की कोणावर केली जाते? की फक्त दिखावा केला जातो असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या पालिका प्रशासनाकडे नवीन रुग्णांसाठी बेड्स देखील उपलब्ध नाहीत. त्यात नागरिकांचा हलगर्जीपणा वाढत असल्याने अजून कडक निर्बंध आणण्याची गरज वाटू लागली आहे. 


महत्वाच्या बातम्या :