Remdesivir Details  : कोरोना व्हायरसचं बळावणारं संकट पाहता, राज्यात रेमडिसवीर औषधांचा तुटवडा झाला आहे, अशा तक्रारी मागील काही दिवसांपासून येत आहेत. टंचाई निर्माण झाल्याने दिसून येत असेल तरी त्याची एफडीए कडून मिळालेल्या माहितीनुसार काही कारणंही आहेत.


पहिल्या लाटेच्या वेळी रेमडिसवीर 15 ते 20 टक्के रूग्णांना दिले जात होते. आज हे प्रमाण खाजगी रुग्णालयातून 80 टक्के पर्यंत पोंहचले आहे. हे स्टॅंडर्ड प्रोटोकॅलमध्ये बसत नाही. हे औषध व्होअर द काऊंटर विक्रीला उपलब्ध होत नाहीत. जिथे फार्मसी आहे तिथे मात्र रूग्णाला ते दिले गेले आहे. 


ही औषधं फक्त प्रिस्क्रिप्शन वरच मिळतात. म्हणून ती बाहेर उपलब्ध करुन दिलेली नाहीत. एका महिनाभरापुर्वी एफडीएने या औषधाच्या किंमती कमी करण्याची मोहीम सुरू केली. एका कंपनीकडून किंमत कमीही करण्यात आली. ती किंमत साडे आठशे रुपये झाली असली तरी आताही एमआरपी नुसार रेमडीसवीरची विक्री साडे चार ते पाच हजारांना होते आहे. 


एका रूग्णालय पाच चे सात डोस दिले की रूग्णांच्या बिलातही वाढ होत आहे. सध्या तरी प्रत्येक रूग्णाला हे इंजेक्शन देण्याची खरच गरज आहे काय हे तपासून पाहणारा आरोग्य विभागाची यंत्रणा नाही. डॅक्टर स्वःतच ठरवून देत आहेत. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे.


साठा कधी सुरळीत होईल?


राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रेमडिसवीर इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी येवू लागल्यात. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद औरंगाबाद इथून या तक्रारी येत आहेत.  उस्मानाबाद शहरात सह्याद्रीचा हे खाजगी रूग्णालय आहे. तिथे 16 रूग्णांना इंजेक्शन हवे आहे. पण बाजारात मिळत नाही. 


Maharashtra Daily Corona Cases: राज्यात कोरोनाची दहशत, दिवसभरात 57 हजारहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद 


1 मार्चनंतर कोरोना रूग्णांचं प्रमाण वाढलं. २० मार्चला कंपन्यांनी नव्या बॅच सुरु केल्या. 10 तारखेला नव्या व्हायल्स तयार होतील. 12 एप्रिल पासून पुरवठा सुरळीत व्हायला सुरूवात होईल, अशी माहिती समोर येत आहे. 


आता जिल्हास्तरावरच काय सूचना आहेत...


रम्यान, आता जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षात मागणी नोंदवून त्या प्रमाणे इंजेक्शन मिळेल. त्यासाठी आरडीसीकडे जबाबदारी देण्याविषयी चर्चा सुरू आहे. त्याशिवाय एफडीएच्या क्रमांकावर संपर्क साधून टंचाई काळात इंजेक्शन उपलब्ध करवून घेतां येईल.