मुंबई : राज्यातील जनतेसाठी चिंताजनक बातमी आहे. राज्यात आज रुग्णसंख्येचा विस्फोट पहायला मिळाला आहे. मागील 24 तासात तब्बल 57 हजार 074 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. नव्यानं कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची ही संख्या इतक्या झपाट्यानं वाढलेली असतानाच आता कोरोना अधिकच गंभीर वळणावर आला असून, परिस्थिती आणखी भयावह होण्याचीही चिन्हं आहेत. यात मुंबई आणि पुण्यात कोरोनाची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात 11 हजार 163 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आज मुंबईत 25 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. तर पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 12 हजार 494 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 64 बाधितांचा मृत्यू. ही आजपर्यंतची एका दिवसात आढळून आलेली सर्वाधिक वाढ आहे. विशेष म्हणजे 30 हजार 351 व्यक्तींची चाचणी केल्यानंतर 12 हजार 494 व्यक्ती बाधीत आढळल्यात. यावरून पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव किती मोठ्या प्रमाणात झालाय हे स्पष्ट होतंय.
मुंबईतही नियम आणखी कडक
अस्लम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत येत्या काळात जिम, मॉल, रेस्तरॉ बंद राहणार असून यामध्ये पार्स सेवा सुरु ठेवण्यात येणार आहे. मुंबईत रात्रीच्या वेळी लागू असणाऱ्या संचाचरबंदीमध्ये आता फक्त अत्यावश्यक सेवांमध्येच कार्यरत असणाऱ्यांना वाहनं चालवण्याची आणि अत्यावश्यक सेवांच्याच वाहनांपुरता परवानगी असणार आहे. यामध्ये रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच प्रवासाची मुभा असेल.
Maharashtra Daily Corona Cases: राज्यात कोरोनाची दहशत, दिवसभरात 57 हजारहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद
राज्यात आज विक्रमी रुग्णसंख्येची नोंद
राज्यातील कोरोना परिस्थितीमुळं कठोर निर्बंध नव्यानं लागू करण्याची घोषणा केल्यानंतर काही वेळातच राज्यातील कोरोनाबाधितांचा दिवसभरातील आकडा आरोग्य विभागानं प्रसिद्ध केला. यामध्ये 24 तासात तब्बल 57,074 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. नव्यानं कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची ही संख्या इतक्या झपाट्यानं वाढलेली असतानाच आता कोरोना अधिकच गंभीर वळणावर आला असून, परिस्थिती आणखी भयावह होण्याचीही चिन्हं आहेत.
राज्यात मागील 24 तासांत कोरोनामुळं 222 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 27508 रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. राज्यात सध्याच्या घडीला गृह लिवगीकरणात आणि संस्थात्मक विलगीकरणात असणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. त्यामुळं आता आरोग्य सुविधा पुरवण्यावर रुग्णांना पूर्ण आणि योग्य उपचार देण्यावरच प्रशासनाचा भर असणार आहे.