मुंबई : टीईटी 2019-20 (TET 2020) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार आणि निकालात फेरफार झाल्याचे उघड झाल्यानंतर शिक्षण विभागाकडून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्ण  अध्यक्ष असणार आहेत. टीईटी परीक्षेमध्ये आर्थिक गैरव्यवहार त्यासोबतच निकालाचा फेरफार झाल्याचे उघड झाल्यानंतर पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. दुसरीकडे ज्या कंपनीला हे कंत्राट दिलं होते, त्याच जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा मालक प्रीतिश देशमुख याला सुद्धा अटक केल्यानंतर या परीक्षेत जो गैरव्यवहार झाला, त्याची संपूर्ण चौकशी शिक्षण विभागाने गठित केलेल्या समितीकडून केली जाणार आहे. 


सदर गैरव्यवहारात  जी ए सॉफ्टवेअर या कंत्राटी कंपनीचा व संबंधित शासकीय अधिकार्‍यांचा सहभाग दिसून येत असल्याने या अनुषंगाने सविस्तर चौकशी करण्याकरिता अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती टीईटी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत जी ए सॉफ्टवेअर कंपनीने केलेल्या कामांमध्ये झालेल्या अनियमितेचची  चौकशी करून त्याबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल सात दिवसात व सविस्तर चौकशी अहवाल पंधरा दिवसात शालेय शिक्षण मंत्र्यांना सादर करणार आहेत


यासंदर्भातला शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या समितीमध्ये शिक्षण संचालक (प्राथमिक त्यासोबतच माध्यमिक), संचालक, माहिती व तंत्रज्ञान संचालनालय , अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ,त्यासोबतच महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाचे आयुक्त हे या समितीचा भाग असतील. त्यामुळे इकडे पुणे पोलीस या सगळ्याचा तपास करत असताना दुसरीकडे शिक्षण विभागाकडून सुद्धा समांतर पातळीवर या सगळ्या प्रकरणात चौकशी केली जाईल.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या 


TET परीक्षा घोटाळा प्रकरण : दुसऱ्या धाडीतही तुकाराम सुपेंच्या घरी घबाड, दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त 


Mhada Exam Paper : म्हाडा पेपर फुटीच्या चौकशीत धक्कादायक माहिती, वापरला खास Code Word


TET Exam Scam : दुसऱ्या धाडीतही तुकाराम सुपेंच्या घरी घबाड, कोण आहेत तुकाराम सुपे?