एक्स्प्लोर

लॉरिएलच्या फेअरनेस क्रीमची 'ही' उत्पादन वापरणाऱ्यांनो सावधान!

मुंबई: त्वचा उजळ करण्याचा दावा करणाऱ्या लॉरिएल कंपनीच्या उत्पादनांमध्ये पारा आढळल्याने कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने लॉरिएलच्या उत्पादनांची तपासणी केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. फेसक्रीममध्ये पारा असल्यास मूत्रपिंड निकामी होण्यासोबतच त्वचेसंबंधी आजार होण्याची शक्यता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते. डब्ल्यूएचओच्या या माहितीनंतर लॉरिएल कंपनी अडचणीत सापडली आहे. लॉरिएलच्या गार्नियर मेन पॉवर लाइट इंटेन्सिव्ह फेअरनेस फेसवॉश, गार्नियर मेन पॉवर लाइट स्वेट प्लस ऑइल कंट्रोल फेअरनेस मॉइश्चराइजर, लॉरिएल पर्ल परफेक्ट फेअरनेस क्रिम (नाईट), लॉरिएल परफेक्ट फेअरनेस प्लस मॉइश्चराइजिंग क्रिम (डे) आणि लॉरिएल पर्ल परफेक्ट रि लायटनिंग व्हाईटिंग फोम या पाच उत्पादनांमध्ये पारा आढळला आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, लॉरिएल कंपनीच्या चाकणमधील प्रकल्पातून अन्न आणि औषध प्रशासन विभागाने नमुने घेतले होते. यातील पाच नमुन्यांमध्ये पाऱ्याचे प्रमाण 0.5 पार्टस् पर मिलीयन (पीपीएम). 1.02 पीपीएम, 1.69 पीपीएम, 1.87 पीपीएम, 2.38 पीपीएम ऐवढे असल्याचे आढळल्याचे सांगण्यात आले होते. याला अन्न आणि औषध विभागाचे आयुक्तांनाही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एप्रिलसमध्ये या क्रीमचे उत्पादन झाले होते. भारतातील औषध आणि सौंदर्य उत्पादन नियमावली 1945 नुसार पारा असलेल्या सौंदर्य उत्पादन तयार करण्यावर बंदी घातली. विशेष म्हणजे राज्यातील एफडीएच्या तपासणीत पाऱ्याचे प्रमाण जास्त आढळले, तर फ्रान्समध्ये लॉरिएलच्या उत्पादनात पाऱ्याचे प्रमाण हे नोंदही घेता येत नव्हते इतक्या प्रमाणात आढळले होते. दरम्यान, महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाचा एप्रिल 2016 मधील अहवाल फ्रान्स, जर्मनी, जपान आणि सिंगापूर या देशांमधील तपासणी अहवालापेक्षा वेगळा आहे. या सर्व देशांमध्ये आमच्या उत्पादनांमध्ये पाऱ्याचे प्रमाण नोंद घेण्याइतपतही नव्हते, असा दावा कंपनीच्या प्रवक्त्यांनी केला आहे. गेल्या सात वर्षात लॉरिएलच्या विक्रीत भरभरुन वाढ झाली असून 2020 पर्यंत 15 कोटी भारतीयांपर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन'
Ashadhi Wari : गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन'
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget