एक्स्प्लोर
कोल्हापुरातील रेणुका मंदिरात गुंडांचा हैदोस, पुजाऱ्यांना जबर मारहाण

कोल्हापूर : कोल्हापुरातील रेणुका मंदिरात भक्तांनी दान केलेले पैसे जबरदस्तीने घेताना अडवणूक केली म्हणून मंदिराच्या पुजाऱ्याला 8 गुंडांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा सर्व मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कोल्हापूरातील जवाहर नगर परिसरात देवी रेणुकाचं जागृत मंदिर आहे. या मंदिरात दररोज भाविकांची गर्दी असते. मंगळवारी देवीचा वार असल्यानं भाविक मोठ्ठी गर्दी करतात. देवीसाठी भक्तांनी दान केलेले पैसे याच परिसरातील काही गुंड मंदिरात येऊन जबरदस्तीनं घेऊन जातात. आज दुपारी असाच काहीसा प्रकार घडला. मंदिराचे पुजारी विलास मेढे मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोर भक्तांना प्रसाद देत होते. यावेळी अनेक भक्तांनी देवी समोर रोख रक्कम दान केली होती. याच दरम्यान या परिसरातील 8 गुंड मंदिरात घुसले. त्यांनी सुरवातीला पुजारी विलास यांना पैसे देण्यासाठी धमकावलं, तर काही वेळातच अचानकपणे त्यांनी पुजाऱ्याला जबर मारहाण करण्यास सुरवात केली. गाभाऱ्यात असणाऱ्या अॅल्युमिनियमच्या परडीनं जबर मारहाण केली. ही मारहाण सुरु असताना त्यातील काही गुंडांनी पुजारी विलास यांना मंदिराबाहेर फरफटत आणलं आणि तिथेही लाथा-बुक्के आणि काठीने मारहाण केली. ही मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या अन्य दोघांनाही मारहाण झाल्याने तेही जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती राजारामपुरी पोलिसांना देण्यात आली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. या परिसरात गावगुंडाचा नियमित त्रास सुरु आहे, मात्र पोलिस याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नागरीकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पाहा व्हिडीओ :
Before You Go
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















