मुंबई : लोककला जीवापाड जपणाऱ्या आणि या कलेवर अतोनात प्रेम असणाऱ्या तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांनी नुकतीच माझा कट्टा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी कलावंत म्हणून आपल्या वाटेतील व्यथा आणि काळीज पिळवटून टाकणारी कहाणी सर्वांपुढे मांडली. कोरोनाच्या संकटात तमाशा कलावंतांच्या आयुष्याची झालेली परवड, त्यांचं दु:ख या दोघांनी रसिकांसमोर  मांडले. लॉकडाऊनकाळात समाजातील अनेक घटकांना सरकारने मदत केली. मात्र, अद्याप तमाशा कलावंतांना कोणतीही मदत न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ज्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत या कलाकारांच्या पाठीवर मायेचा हात फिरवल्याचं पाहायला मिळालं. 


आजचा माझा कट्टा पाहून खूप रडलो, असं म्हणत एत तमाशा रसिक आणि कुस्ती संघटक दत्तात्रय जाधव यांनी एबीपी माझाचे आभार मानले. 'तमाशा आणि कुस्ती आमचा जीव आहे. कलावंतांना भरपूर त्रास आहे. आपण एक acount नंबर आणि गुगल पे नंबर देऊन सहकार्य करावे, लोक भरपूर मदत करतील'. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  'जसे विठाबाई यांचा तमाशा उभा करण्यात त्यावेळचे लोकसत्ता संपादक माधव गडकरी आणि त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी हातभार लावला होता आणि त्याची नोंद इतिहासात लिहिली आहे. तसेच कोरोना काळात तमाशाला मोठा आधार राजीव खांडेकर आणि ABP माझाने मदत केली होता, याचीसुद्धा इतिहासात नोंद होईल', असं म्हणत त्यांनी या कलावांतांप्रती आपुलकिची भावना व्यक्त केली. 


माझा कट्टावर आपल्या व्यथा मांडताना कलावंत रघुवीर खेडकर व मंगला बनसोडे ताई ज्या तळमळीने आपल्या भावना व्यक्त करत होत़्या की ते ऐकताना, पहाताना अश्रु अनावर झाले, ज्यांनी हा खास कार्यक्रम पाहिला असेल, त्यांना नक्कीच त्यांच्या वेदना पाहुन अंतकरण भरुन आले असेल. लोककला जपणाऱ्या या कलावंताच्या समस्येची शासनाने तसेच समाजातील दानशुर व्यक्तींनी दखल घेतली पाहीजे तरच जगण्यासाठी चाललेल्या त्यांच्या धडपडीला बळ येईल. कलावंत रघुवीर खेडकर यांच्या मुलालाही जगण्यासाठी, अर्थार्जनासाठी धडपड करावीच लागतेय या सर्व बाबी खुप वेदनादायी आहेत, ही वस्तुस्थिती सतिश पाटील (कराड) यांनी आपली प्रतिक्रिया देत मांडली. 


आम्ही लोककलावंत आहोत ही आमची चूक आहे का? रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे यांना माझा कट्ट्यावर अश्रू अनावर


लॉकडाऊनमुळे आलेल्या परिस्थितीमुळे मंगलाताई बनसोडे आणि रघुवीर खेडकर हे दोन लोककलावंत  माध्यमांवरत, सर्वांसमक्ष रडले, ज्यांना पाहून सारं राज्य हळहळलं. आता या कलावंतांची केंद्र आणि राज्य सरकारला दया येणार का, असा सवाल श्रीमंत कोकाटे यांनी विचारला. 



अनेकांनी या कलावांतांना सढळ हस्ते मदत करण्यासाठी पुढाकार घेत नेमकी मदक कोठे आणि कशी करण्यात येईल याबाबतही विचारणा केली. 
मराठी भाषा , मराठी संस्कृती, मराठी जन असल्या आशयाच्या उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या प्रत्येकाने जरूर एकावी ही मुलाखत, असं म्हणत तमासगीर, गोंधळी, शाहीर, कीर्तनकार सर्वच कलाकारांच्या प्रश्नांना रोखठोक मांडत इथल्या पांढरपेशी सरकार आणि समाज धुतलाय या दोघांनी हे वास्तव दिशा पिंकी शेख यांनी मांडलं. 'कोविड आणि कलाकार हा संघर्ष वाटतो तितका सोपा नाही आणि या लढ्यात वंचित बहूजन आघाडी नेहमी कलावंतांच्या लढ्यात सहभागी असेल, असं म्हणत त्यांनी कलावंतांच्या संघर्षाला सलाम केलं. 


पांगळ्यांच्या सोबतीला, येऊ द्या बलदंड बाहू | निर्मितीची मुक्तगंगा, द्या इथे मातीत वाहू, असं लिहित हर्षाली घुले यांनी मोजक्या शब्दांत कट्टा सर्वांपुढए मांडला. खेडकर आणि मंगलाताई बनसोडे यांनी मांडलेल्या व्यथा सुन्न करणाऱ्या होत्या.कुठल्याही सामान्य संवेदनशील माणसाला अंतर्मुख करायला लावणाऱ्या होत्या.विशेषतः या संपूर्ण मुलाखतीत सांगितलेले अनेक अनुभव आपण लोककलेच्या व्यवहाराच्या दृष्टिकोनातून बघायला हवेत. असंही त्या म्हणाल्या.