एक्स्प्लोर
Advertisement
36 फूट उंच, 90 किलो वजन... देशातील सर्वात उंच राजमुद्रा सोलापुरात!
सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सोलापूरकरांनी अभिनव पद्धतीने मानवंदना दिली आहे. बाबासाहेबांच्या 125 जयंतीच्या निमित्ताने आंबेडकर चौकात देशातील सर्वात उंच राजमुद्रा बसवण्यात आली आहे. यानिमित्ताने स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेल्या सोलापूर शहरातील आंबेडकर चौकाला पहिलं स्मार्ट चौक बनवण्यात आलं आहे.
तब्बल 36 फूट उंचावर असलेली ही राजमुद्रा आणि अशोक स्तंभ सोलापूर शहराचं वैभव बनलं आहे. महामानवाच्या जयंती दिनी राजमुद्रेचं लोकार्पण होणार आहे.
26 फूट उंच अशोक स्तंभ आणि त्यावर तब्बल साडे आठ फूट उंचीची राजमुद्रा. ही देखणी कलाकृती साकार सोलापुरात झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ही कलाकृती कायमस्वरूपी बसवण्यात आली आहे.
2009 साली सोलापूर महानगरपालिकेत ही कलाकृती साकार करण्याचा प्रस्ताव झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने याला अंतिम स्वरूप प्राप्त झालं आहे.
महानगरपालिकेने 18 लाख खर्चून ही कलाकृती उभारली आहे. ब्राँझ धातूमध्ये बनवलेली राजमुद्रा तब्बल 90 किलो वजनाची आहे. 50 कामगारांनी अहोरात्र काम करून 29 दिवसात ही कलाकृती पूर्णत्वास आणली. बाबासाहेबांच्या 125व्या जयंती दिवशी ही देखणी वास्तू लोकार्पण करण्याच्या प्रयत्नाला यश आलं आहे.
या चौकाच्या चारी बाजूने राज्यघटनेचा सरनामा शिल्परुपात साकारण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत सोलापूर शहराचा समावेश झाला आहे. स्मार्ट सिटीच्या शहरातील वाटचालीतला हा जणू पहिला टप्पा ठरला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement