मुंबई : तलाठी भरतीसंदर्भात (Talathi Recruitment ) महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तलाठी भरतीची याच आठवड्यात गुणवत्ता यादी जाहीर होईल. तसेच तलाठी भरती प्रक्रियेत कुठलीही अनियमितता झाली नसल्याचं देखील सांगण्यात येतंय. भरती प्रक्रिया राबवणाऱ्या टाटा इन्स्टिट्यूटची सोमवार 8 जानेवारी रोजी मंत्रालयात बैठक पार पडली. वाढीव गुण हा मुल्यांकनाचा एक भाग असल्याची माहिती महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलीये. 


या भरती प्रक्रियेदरम्यान एकूण 500 हरकती आलेल्या होत्या. त्यापैकी 24 हरकती स्विकारण्यात आल्या आहेत. शहीद भगतसिंग यांच्या संदर्भातील प्रश्नावर सर्वात जास्त हरकती आल्याची माहिती समोर आलीये. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार  यांनी आक्षेप घेतल्यानंतर या भरती प्रक्रियेवर  प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यामुळे पाच हजार पदांसाठी राबवलेल्या तलाठी भरतीची गुणवत्ता यादी याच आठवड्यात जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 


तलाठी भरती परीक्षेच्या निकालामुळे


गेल्या वर्षी तलाठी भरती परीक्षा 3 भागात आणि 57 सत्रामध्ये घेण्यात आली आहे. या परीक्षेस महाराष्ट्र भरातून तलाठी पदासाठी 10 लाख 41 हजार 713 परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले. 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली. पण निकाल जाहीर झाला आणि एकच गोंधळ उडाला.  


200 पेक्षा जास्त गुण कसे मिळाले ?


सामान्यीकरण प्रक्रियेदरम्यान काठिण्य पातळीनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांमध्ये वाढ किंवा घट करण्यात येते. त्यामुळे काही उमेदवारांचे सामान्यीकृत गुण हे एकूण गुणांपेक्षा जास्त होऊ शकतात. तलाठी भरती परीक्षेमध्ये एकूण 48 उमेदवारांना 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाले आहेत. सामान्यीकृत गुण प्रसिद्धी करणे हे महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा निवड प्रक्रिया सुरु करण्यात येईल, तेव्हा आरक्षण व सारखे गुण मिळालेल्या अनेक उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांना सर्वाधिक सामान्यीकृत गुण मिळालेले आहेत. त्यांची निवड तर्कसंगतीने करता येणे शक्य होईल व परीक्षार्थीच्या मनात नेमक्या गुणांबाबत गोंधळ उडणार नाही.


राज्य सरकारनं काय म्हटलेय ?


तलाठी भरती परीक्षा 2023 मध्ये 17 ऑक्टगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीमध्ये ३ भागात एकूण 57 सत्रामध्ये घेण्यात आली. सदर परीक्षेस महाराष्ट्रभरातून जिल्हानिहाय तलाठी पदासाठी एकूण 10,41,713 परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. सदर उमेदवारांपैकी 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली. परिक्षेनंतर सदर परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्न उत्तराबाबत उमेदवारांनी विचारलेल्या शंकांचे TCS कंपनीने तीन वेळा शंकासमाधान (एकूण 149 प्रश्नांचे) केले. दिनांक 04/01/2024 अखेर शंका समाधान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर टीसीएस कंपनीद्वारे तलाठी भरती जाहिरातीमध्ये प्रथमतः प्रसिद्ध केल्यानुसार 57 सत्रांमध्ये विचारलेल्या प्रश्नांच्या आधारे 57 प्रश्न पत्रिकांची काठिण्य पातळी विचारात घेऊन उमेदवारांनी प्रश्नांची उत्तरे देऊन मिळवलेल्या उत्तरांच्या गुणांवर गुण सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. 


हेही वाचा : 


तलाठी भरती परीक्षेत 200 पैकी 214 गुण कसे मिळाले? सरकारने लॉजिक सांगितलं, म्हणाले ते तर सामान्यीकृत गुण!