यवतमाळ : यवतमाळच्या जंगलातील टी 1 वाघिणीला ठार मारल्यानंतर वन विभागाचं पथक तिच्या दोन बछड्यांचा शोध घेत आहे. बोराटीच्या जंगलात काल शूटर नवाब शापात अली खान यांचा पुत्र असगर अली खानने तिला बंदुकीची गोळी घालून ठार मारलं होतं.
टी 1 वाघीण जिवंत असताना बछड्यांना शिकार मिळवताना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागत नव्हता. तसेच अन्य वन्य प्राण्यांचाही त्यांना धोका नव्हता. आता मात्र टी 1 सोबत राहणारा टी 2 नावाचा नर वाघ आहे. भविष्यात त्याला त्याचे बछडे प्रतिस्पर्धी म्हणून आव्हान देऊ शकतात. म्हणून टी 2 वाघ या 11 महिन्यांच्या बछड्यांवर हल्ला करु शकतो, अशीही माहिती वन विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
इतरही वन्य प्राणी या भागात आहेत. त्यांच्याकडूनही या छोट्या बछड्यांवर हल्ला केला जाऊ शकतो. त्यामुळे वनविभागाचे पथक हे आठ-आठच्या समूहाने बोराटी-राळेगाव मार्गावर असलेल्या तिन्ही पुलांजवळ सर्च मोहीम करत आहेत.
वाघिणीचे बछडे सध्या आपल्या आईच्या शोधात इतरही ठिकाणी जाऊ शकतात. तसेच अन्नासाठी भटकंती करु शकतात. त्यामुळे वन विभागाचे पथक सध्या बोराटी परिसरातील नाला परिसरात शोध घेत आहेत. सात किंवा आठ जणांच्या पथकांमध्ये हे जंगलात शिरुन पथक पगमार्क शोधत आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी त्यांना बेशुद्ध करुन कसं जेरबंद करता येईल, या दृष्टीने ही मोहीम सुरु केली आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
टी 1 वाघिणीच्या बछड्यांना वाघासह वन्य प्राण्यांचा धोका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Nov 2018 11:51 AM (IST)
टी 2 वाघ 11 महिन्यांच्या बछड्यांवर हल्ला करु शकतो, अशीही माहिती वन विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -