एक्स्प्लोर

मुंबईच्या दुधाची उद्याची पॅकिंग पूर्ण करुन तीन दिवसांचा साठा, 'वारणा'ची तयारी

पुणे-बंगळुरु महामार्गावर वाळवा तालुक्यातील केदारवाडी फाट्याजवळ वारणा दूध संघाचा टँकर सोडवून कार्यकर्त्यांनी दूध रस्त्यावर सोडून दिलं.

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाची पहिली ठिणगी सांगली जिल्ह्यात पडली आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावर वाळवा तालुक्यातील केदारवाडी फाट्याजवळ वारणा दूध संघाचा टँकर सोडवून कार्यकर्त्यांनी दूध रस्त्यावर सोडून दिलं. यावेळी टँकरच्या काचा आणि हेडलाईट फोडून टँकरचंही नुकसान करण्यात आलं. रविवारी सायंकाळपासून दूध आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार सांगली जिल्ह्यातून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मुंबईचा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. अपडेट : नवी मुंबई : उद्या मुंबई आणि उपनगरांमध्ये दुधाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी वारणाकडून तयारी, वारणा दूध महासंघाकडे 3 दिवस पुरेल एवढा साठा, उद्या मुंबईला होणाऱ्या दूध पुरवठ्याची पॅकिंगही पूर्ण, वारणा मुंबईत दररोज 2 लाख लिटर दूध पुरवठा करते नाशिक : जिल्ह्यातील प्रसिद्ध नस्तनपूर येथील शनी महाराजांना दुधाचा अभिषेक घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. कोल्हापूर : गोकुळ दूध संघाचा राजू शेट्टींच्या आंदोलनाला एक दिवसाचा पाठिंबा, उद्या एक दिवस गोकुळ दूध संघ दुधाचं संकलन थांबवणार, गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय नेमक्या मागण्या काय? दूध उत्पादकांना सावरण्यासाठी प्रतिलिटर पाच रुपये सरकारला देणं शक्य आहे. गोवा, कर्नाटक सरकार अशी मदत करतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही तशी मदत करावी, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे. पाच रुपयांच्या अनुदानाची ही मागणी गाईच्या दुधासाठी असून दररोज अतिरिक्त ठरणारं चाळीस लाख लिटर गाईच दुध सराकरने सत्तावीस रुपये प्रति लिटर दराने खरेदी करण्याची मागणीही स्वाभिमानीकडून करण्यात आली आहे. या आंदोलनातून मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा स्वाभिमानीचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईची दूधकोंडी होण्याची शक्यता आहे. दूध उत्पादकांना संरक्षण देणार : जानकर काहीही झालं तरी मुंबईचा दूध पुरवठा कमी होऊ देणार नाही, आमचेही कार्यकर्ते मैदानात आहेत, असं पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. ज्यांना आंदोलन करण्याची इच्छाच आहे, त्यांच्याबद्दल आम्ही काही सांगू नाही शकत. पण मुंबईला दूध पुरवठा कमी होणार नाही, संरक्षण दिलं जाईल, आमचेही कार्यकर्ते मैदानात आहेत. दूध उत्पादकांनी न घाबरता दूध पुरवठा करावा, तुम्हाला पोलीस संरक्षण दिलं जाईल, असं महादेव जानकर यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरी, चिपळुणवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरीवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Maharashtra Rain Update: मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत, रस्ते वाहतूक ठप्प; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोण-कोणते रस्ते बंद? A टू Z माहिती
मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले, तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत, रस्ते वाहतूक ठप्प; अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, कोण-कोणते रस्ते बंद? A टू Z माहिती
Mumbai Mankhurd News: मानखुर्दमध्ये तीन मजली चाळीचा भाग पत्त्यासारखा कोसळला, 5 निष्पाप चिमुकल्यांसह 6 जणांचा जागीच दुर्दैवी अंत, महापौर रितू तावडे, गिरीश महाजन घटनास्थळी दाखल
मानखुर्दमध्ये तीन मजली चाळीचा भाग पत्त्यासारखा कोसळला, 5 निष्पाप चिमुकल्यांसह 6 जणांचा जागीच दुर्दैवी अंत, महापौर रितू तावडेंकडून कुटुंबीयांचे सांत्वन अन् म्हणाल्या....
Maharashtra Rain: मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा रौद्रावतार, संकटांच वादळ आजही घोंघावणार, हवामान विभागाकडून राज्यभरातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट, वाचा पावसाचे सर्व अपडेट्स
मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा रौद्रावतार, संकटांच वादळ आजही घोंघावणार, हवामान विभागाकडून राज्यभरातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट, वाचा पावसाचे सर्व अपडेट्स

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Goa Highway Rain: राज्यात पावसाचा हाहा:कार! मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, मिसिंग लिंकवर दरड कोसळली, खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली
राज्यात पावसाचा हाहा:कार! दरड कोसळून मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली
Mumbai Pune Expressway missing Link: मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरी, चिपळुणवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरीवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Embed widget