Sushma Andhare on BJP : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणं, हा एका अर्थाने भाजपचा आणि पर्यायाने नरेंद्र मोदी यांचा नैतिक पराभव आहे. राहुल गांधींच्या प्रश्नांना जेव्हा ते उत्तरच देऊ शकलेले नाहीत. तेव्हा त्यांच्यापासून पळ काढण्यासाठी हिडंनबर्ग रिपोर्टवर जेव्हा त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही आणि अदानीचे हितरक्षण करणे ही त्यांची परम जबाबदारी आहे.. या न्यायाने ते वागत असल्यामुळे त्यांनी ही कारवाई केली.. पण ही कारवाई ही लोकशाहीची हत्या करणारी आहे, अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
आता जेव्हा ते ओबीसीचा मुद्दाच्या आडून खेळायला बघतात.. तेव्हा भाजपाला कळलं पाहिजे की दर वेळेला जातीचे आणि धर्माचे कार्ड खेळणं बंद करावं.. कारण ओबीसीबद्दल जर इतकं प्रेम भाजपाला असेल.. तर ओबीसीचा जातनिहाय जनगणनेचा मुद्दा भाजपा का विसरत आहे. जर ओबीसीबद्दल एवढं प्रेम खरंच भाजपाला वाटत असेल तर भाजपाने राष्ट्रीय आणि महाराष्ट्र दोन्ही राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरची आत्तापर्यंत ओबीसीच्या कित्येक नेतृत्वांना कुजवत का ठेवलं? असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला.
या सगळ्या मुद्द्यांवरती भाजपाने फार अकांतांडवकरण्याची गरज नाही. असे कोणी नेते वगैरे नसतात हे सगळे हितसंबंधांचे राजकारण करणारे लोक असतात. अशा हितसंबंधांचा राजकारण करणाऱ्या लोकांना नेते म्हणून त्यांची उंची वाढवू नये किंवा ती भूमिका कुठल्याही पक्षाची भूमिका म्हणूनही बघितली जाऊ नये. भाजपाची कालची कृती ही लोकशाहीची गडचिप्पी करणारी हुकूमशाहीच्या नव्या तंत्राला जन्म देणारी आहे. भारतातल्या सगळ्यात मोठ्या लार्जेस्ट पार्टीच्या नेतृत्वावर जर आपण अशी कारवाई केली तर इतर सदस्यांना सुद्धा तशी दहशत बसू शकते, यासाठी जाणीवपूर्वक घबराटीचे वातावरण तयार व्हावं, विरोधकांनी प्रश्नच विचारू नयेत यासाठी केलेली कृती आहे, असा हल्लाबोल अंधारेंनी केला.
ही कारवाई चुकीची आहे हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगत राहू. आता राहुल गांधींना इग्नोर करूच शकत नाहीत. या स्टेजमध्ये जेव्हा राहुल गांधी स्वतःची इमेज तयार करतात, तेव्हा भाजपच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. 14 पक्षांनी एकत्रित येऊन ईडीच्या संदर्भाने आता थेट न्यायालया धाव घेतलेली आहे. भाजप वगळता सर्व पक्षांनी एकत्रित मोट बांधत आहे, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सभा चालू आहेत. दोन तारखेला छत्रपती संभाजीनगरला होणाऱ्या सभेमध्ये सुद्धा हा मुद्दा चर्चेला येईल. उद्याच्या मालेगावच्या सभेतही चर्चेला येईल. त्यामुळे हा प्रश्न फक्त राहुल गांधींचा किंवा फक्त काँग्रेसचा नाही तर हा प्रश्न संपूर्ण भारताच्या लोकशाहीचा प्रश्न आहे. त्यामुळे निश्चितपणे यावर सगळेच पक्ष एक होत आहे, असे अंधारे म्हणाल्या.